Home महत्वाची बातमी “कोरोना जगणे शिकवून गेला” – डॉ. स्वप्नील मानकर

“कोरोना जगणे शिकवून गेला” – डॉ. स्वप्नील मानकर

446

इतक्यात माणूस प्राणी खूप शेफारला होता !
त्याला वाटत होतं की मी तीर मारला होता !!
अशा उर्मटपणाला एक दणका देऊन गेला !
कोरोना तू माणसाला जगणे शिकवून गेला !!

पहिले तर आम्ही कधीच घरात राहत नव्हतो !
राहलं तरी एकमेकांशी संवाद साधत नव्हतो !!
बाप मुलाला तीनतीन दिवस नाही दिसायचा !
आईला मोबाईल शिवाय वेळ कुठे असायचा !!
अशा दुरावलेल्या नात्यांना लळा लावून गेला !
कोरोना तू माणसाला जगणे शिकवून गेला !!

रुमाल न धरता खोकायचो कुठेही थुंकायचो !
जेवण करण्याआधी हातपाय कधी धुवायचो !!
स्वच्छतेला तर आम्ही केला ही नव्हता स्पर्श !
गलिच्छपणाने राहण्यात वाटायचा किती हर्ष !!
आता सॅनिटायजरचा तुटवडा करवून गेला !
कोरोना तू माणसाला जगणे शिकवून गेला !!

नुसतं हॉटेलमधे खाणे आणि मॉलमधे जाणे !
व्यसनांच्या आहारी जाता करू उभे धिंगाणे !!
विसरून गेला होता आपली सुशील संस्कृती !
मोडर्नतेचे नाव देऊन फोफावत होती विकृती !!
हॉटेलांना कुलूप लागले सात्विक बनवून गेला !
कोरोना तू माणसाला जगणे शिकवून गेला !!

मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च सारे पडले बंद !
जातीवाद धर्मांधतेचा येईना आजकाल गंध !!
आंदोलने थंड पडली मोर्चे ही पेंगलेत शांत !
सीमेवरचे भांडण मिटले ओसाड पडले प्रांत !!
खरी दहशत काय असते ती दाखवून गेला !
कोरोना तू माणसाला जगणे शिकवून गेला !!