Home महत्वाची बातमी कोरोनाशी लढा : पंतप्रधान मोदींचे लोकांना आवाहन – तुम्ही ज्या शहरात आहात,...

कोरोनाशी लढा : पंतप्रधान मोदींचे लोकांना आवाहन – तुम्ही ज्या शहरात आहात, काही दिवस तेथेच रहा, इतरत्र गेल्याने दुसऱ्यांना त्रास होईल

192

राजेश भांगे

नवी दिल्ली – जनता कर्फ्यूच्या एक दिवस आधी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रेल्वे स्टेशन, बस स्थानकांवर गर्दी वाढवून आपण आपल्या आरोग्याशी खेळत आहोत. जे लोक रोजगारासाठी इतर शहरात गेले आहेत त्यांनी काही दिवस तेथेच राहावे, त्यांनी मूळ गावी जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. असे केल्याने तुम्ही जेथे जाणार आहात तेथील लोकांच्या सु्द्धा अडचणी वाढवताल, असेही मोदी म्हणाले. तत्पूर्वी लोकांनी फक्त फॅशन किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोरोना संसर्गाची तपासणी करू नका असे आवाहन आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.आरोग्य मंत्रालयाने शनिवारी म्हटले की, लोकांनी फक्त फॅशन किंवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोरोना व्हायरस संसर्गाची टेस्ट करू नये. प्रोटोकॉलनुसार लोकांची तपासणी केली जाईल, असे आरोग्य आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या दरम्यान त्यांनी आरोग्य मंत्रालयाने देशातील वाढत्या कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उचललेल्या उपायांवर भाष्य केले.
मास्क, हँड सॅनिटायझरच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित
सह सचिवांनी स्पष्टीकरण दिले की मास्क-सॅनिटायझरच्या किमती केंद्र सरकारने निश्चित केल्या आहेत. २ प्लाय मास्कची किंमत ८ रुपये प्रति मास्क, आणि ३ प्लाय मास्कची किंमत १० रुपये प्रति मास्कपेक्षा अधिक असणार नाही. तर सॅनेटायझरच्या २०० एमएल बॉटलची किंमत १०० रुपयांपेक्षा अधिक असणार नाही. सदरील किमती ३० जून २०२० पर्यंत संपूर्ण देशात लागू असतील.
देशात १११ लॅब सुरू झाल्या आहेत – सहसचिव
सहसचिवांनी सांगितले की, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे १ हजारांहून अधिक ठिकाणी क्रिटिकल केअर मॅनेजमेंटची ट्रेनिंग देण्यात आली आहे जेणेकरून परिस्थिती बिघडल्यानंतर त्याचा सामना केला जाईल. तर देशातील विविध भागांत १११ लॅब सुरु करण्यात आल्या आहेत. आम्ही खासगी लॅबच्या बाबतीत निर्णायक स्थितीत पोहोचलो असून संध्याकाळपर्यंत ऑर्डर जारी केली जाईल.
आतापर्यंत १६०० भारतीयांना क्वारंटाइन करण्यात आले.
देशातील क्वारंटाइन सेंटरमध्ये १६०० भारतीयांव्यतिरिक्त परदेशी नागरिकांना भरती करण्यात आले आहे. आज इटलीच्या २६२ लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही सद्य परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे, अशी माहिती सहसचिवांनी दिली.