Home विदर्भ कोरोना , खरंच विनोदाचा विषय आहे का – दीक्षा भावे

कोरोना , खरंच विनोदाचा विषय आहे का – दीक्षा भावे

52
0

कोरोनामुळे अचानक सुट्टया मिळालेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा.., परंतु मला तुमच्या हया आनंदाला नाईलाजाने थोडे गालबोट लावायचे आहे.अन्यथा माझा हा विचार मला क्षणभरही स्वस्थ बसु देणार नाही.
आपण मला सांगा ,कोरोना नावाचा विषाणू चीनमधून येतो आणि पुर्ण जगाला थक्क करून चक्क घरी बसवतो. आम्हा शाळा, कॉलेजच्या मुलामुलींना सुट्टयांचा आनंदच होतोय. कोरोनावर आपण वेगवेगळे आणि सर्वांनी वाहवा करावे असे गाणे, विनोद करतोय. त्याला थोडंही गांभिर्याने घेण्याचा विचार आम्ही करत नाही. का ? तर तो विषाणू लहान शहरात, खेडया -पाड्यात अजून आलेला नसून मोठमोठया शहरात पाहायला मिळत आहे. परंतू माझ्या मिञ -मैञिणिंनो,कोरोना खरंच फक्त ‘विनोदाचा विषय आहे का?’ या विषयावर मला आपल्याला थोडं सांगावसं वाटतं !
विचार करा, या विषाणूमुळे शिर्डी, शेगाव ,पंढरपूर यासारखी देवांची दारे आपल्याला लागण होऊ नये म्हणून बंद करण्यात आली आहेत. त्यावरही आपले छान विनोद पाहायला मिळतात की, देवाने सुद्घा दारे बंद केली वगैरें वगैरे . परंतू मला सांगा , हया मोठमोठया मंदिरांजवळ लहान लहान व्यवसाय करुन पोट भरणारया लोकांचे काय ? हातात फुले घेऊन विकणारे असो, डाळिंबाचे दाणे, अननसाचा काप विकणारे असो किंवा ते कुंकू, प़्रसादाच्या पुडया घेऊन विकणारी लहान लहान गोंडस मुलं असो. त्यांचा विचार आला का तुमच्या मनात कधी ? अरे दिवस भर…..घ्या ना साहेब, घ्या की मँडम म्हणून आपला व्यवसाय करणारया त्या लोकांचा विचार केला की माझ्या अंगावर शहारे येतात.शरिराचा थरकाप होतो माझ्या . नकळत डोळे भरुन येतात माझे. कारण, आज त्यांच्या त्या व्यवसायाचा मुळ स्ञोत असणारे भाविक आज त्यांना ते येत नाहीयत!
फक्त हेच लोक नाहीत हो, शेतकरयाचा विचार आला मनात कधी ? गर्दी जमू नये म्हणून आठवडे बाजार बंद करण्यात आले आहेत. टमाटे, कोबी, कोथिंबीर , मेथी अशा सर्व प़्रकारच्या भाज्या कापण्यात आल्या आहेत. परंतू ,बाजार बंद असल्यामुळे त्या कापून करावे तरी काय ? आणि नाही कापल्या तर तशाही त्या किती दिवस राहणार ? हा भला मोठा प्रश्न आहे.
हेच नाही हो, असे अनेक लोक आपल्या देशात आपल्याला पाहायला मिळतील. कामगार असोत, रिक्षा चालक असोत, फळ विक्रिते असोत, भाजीवाले असोत त्यांना कोरोनाची लागण झालेली नसली तरी त्याच्यापासून होणाय्रा वेदना माञ त्यांना सहन कराव्या लागत आहेत.
त्यामुळे ह्या विनाशकारी विषाणूची लागण आपल्याला होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्या. लवकरात लवकर हा विषाणू संपुष्टात येओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करा. कारण, फक्त आपण पोटभर जेवलो आणि आपले बाकीचे भारतीय बांधव भुकेले झोपले,तर मलाच काय, तुम्हालाही अतोनात वेदना होतील.त्यामुळे उद्या होणारया जनता संचारबंदीला मनापासून साथ द्या . शेवटी मला एवढेच सांगावसे वाटते,
कोरोनामुळे , अनेक लोक बंद करुन बसतील आपले कारोबार पण माझे काय करतील ते गरिब कामगार ज्यांना रोज पर्याय नसतो मिळाल्याशिवाय रोजगार
तुम्ही घ्याल हो,
सुट्टयांचा आनंद फार
परंतू माझ्या त्या गरिब बांधवाने,
कसा उचलावा मुलाबाळांच्या पोटाचा भार?

दीक्षा भावे
अंजनगाव सुर्जी , जिल्हा- अमरावती.

Unlimited Reseller Hosting