Home बुलडाणा कर्फियु नव्हे तर केयर फॉर यू –  श्वेता म्हाले पाटील आमदार चिखली

कर्फियु नव्हे तर केयर फॉर यू –  श्वेता म्हाले पाटील आमदार चिखली

311

चिखली – प्रा.तनज़ीम हुसैन

आपण पाहात आहोत एका खूप मोठ्या युद्धाला संपूर्ण जग हे तोंड देत आहे भारतामध्ये महाराष्ट्र हा covid-19 कोरोना वायरस ने बाधित झालेला प्रदेश आहे त्यामुळे महाराष्ट्रीयन म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या युद्धाला आपल्याला समोर जायचं आहे सध्याच्या घडीला या वायरस वर प्रतिबंधात्मक लस नाही या रोगाचा संसर्ग झाल्यावर त्याच्या वरती औषध उपचार सुद्धा सध्याच्या घडीला जगामध्ये कुठेही उपलब्ध नाहीये याचा औषध जर असेल तर ते आहेत सोशल डिस्टन्स याचा अर्थ आपण स्वतःला गर्दीपासून दूर ठेवलं पाहिजे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहितासाठी एक निर्णय घेतलेला आहे जनतेचा कर्फियु माझे मते याचा अर्थ असा आहे की केयर फॉर यू कोरोना चा संसर्ग वर मात करण्यासाठी 22 तारखेला म्हणजे उद्या सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनतेसोबत ना राहता एक दिवस आपल्या कुटुंबा सोबत रहा कारण आपण आपल्या कुटुंबासाठी पूर्ण जग आहे. या संदर्भात आज पत्रकार परिषदेला संबोधित करताना आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी
सर्व नागरिकांना विनंती केली की आपण आपल्या कुटुंबासोबत रहा जगासाठी आपण एक व्यक्ती आहात परंतु आपल्या कुटुंबासाठी आपण पूर्ण जग आहोत अशा वेळेला आपण सर्वांनी या युद्धाला समोर गेलं पाहिजे जे जे काही सूचना प्रशासनाला केलेले आहेत त्या सूचनांचे पालन आपण केले पाहिजे अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सगळेच दुकान बंद करण्यात येतील हे जे बंद आहे हा सध्याच्या घडीला आपण 31 तारखेपर्यंत ठेवलेला आहे कालच आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सध्याच्या घडीला हा बदल 31 तारखेपर्यंत आहे परंतु जास्त झाला तर हा बंद आपल्याला पुढे न्यावा लागेल अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाला दिले आहेत तरी सर्व नागरिकांना विनंती केली की आपण प्रशासनाला सहकार्य करावं पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली या वेळी चिखली मतदार संघाचे आमदार सौ. श्वेता महाले पाटील नगर अध्यक्षा सौ.प्रिय बोंद्रे,पंचायत समिती सभापती सौ.तायडे ,उपसभापती शमशाद पटेल,आदी उपस्थित होते.