Home विदर्भ माध्यम साक्षारता संस्थेची कोरोना व्हायरस जनजागृती मोहीम.!

माध्यम साक्षारता संस्थेची कोरोना व्हायरस जनजागृती मोहीम.!

137
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील देवळी शहरामध्ये मध्ये माध्यम साक्षारता संस्थेने कोरोना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केली जनजागृती. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदेशा वरून कोरोना वायरस ला रोखण्यासाठी साठी स्वयंसेवी वृत्तीने जनजागृती करन्यात करण्यात आली. बस स्टँड परिसर व पुलगाव नाक्यावर कोरोना व्हायरस ची माहिती व प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांचे संदेश असणारे पत्रक वाटण्यात आले, त्याचबरोबर उद्याला दिवसभर संसर्ग टाळण्यासाठी विषाणू ग्रस्ताच्या संपर्कात न यावे आणि बाहेर पडण्याची आवश्यकता भासल्यास तोंडावर व नाकावर मास्क बांधून बाहेर पडावे असे आवाहन संस्थेच्या वतीने कार्यकर्त्यांनी केले.
तोंडावर मास्क बांधण्यासाठी आज अत्याधुनिक मास्क बाजारात उपलब्ध आहेत, साधारण मास्क ते अत्याधुनिक मास्क असे मास्क अव च्या सव भावात बाजारात, मेडिकल व रस्त्यावर उपलब्ध आहे. आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार स्वच्छ कापडाचे जरी जसे रुमाल, दुपट्टा किंवा कापडाला स्वच्छ धोवून जरी बांधले तरी विषाणूचा प्रादुर्भाव टाळू शकतो. याच पार्श्वभूमीवर माध्यम साक्षरता संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कापडाचे विविध प्रकारचे मास्क तयार केले व त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच वाटपही केले. या वेळी संस्थापक विजय पचारे, आकाश खंडाते व विक्की तुपे प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थापक विजय पचारे यांनी घरघुती मास्क बनवून वापरले तर अनेक प्रकारचे फायदे उदा. कोरोना व्हायरस किंवा इतर व्हायरस वासून होणारा, संसर्ग आपण टाळू शकतो. प्रदूषनापासून व उन्हापासून तोंडाचे व चेहऱ्याचे संरक्षण करु शकतो. वातावरणात असणारे अनेक विषाणू किंवा टीबी सारखे विषाणू पासून ही संरक्षण करू शकतो. जर आपणास असे हॅण्डमेड मास्क लागणार असेल तर माध्यम साक्षरता संस्थेचे कार्यकर्ते हनू आणि सागर किंवा स्वतः मला संपर्क करू शकता, आम्ही आपणास मोफत मास्क उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी विजय पचारे यांनी केले.