Home बुलडाणा जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्ष्यांसाठी जलपात्र वनश्री जनाबापू मेहेत्रे यांचा स्तुत्य उपक्रम,

जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्ष्यांसाठी जलपात्र वनश्री जनाबापू मेहेत्रे यांचा स्तुत्य उपक्रम,

311

प्रतिनिधी रवी अण्णा जाधव

देऊळगावराजा :- चिमणी हा पक्षी सर्वांना आवडणारा व परिचयाचा पक्षी ! चिमणीला अन्नसाखळीत फार महत्त्वाचे स्थान आहे. पर्यावरण संवर्धनामध्ये चिमणीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु वाढते प्रदूषण, वारेमाप होणारी वृक्षतोड, अवर्षण, दुष्काळ तसेच पिकांवरील विषारी औषधांच्या अतिरिक्त फवारणीमुळे आणि इतर अनुषंगिक कारणांमुळे चिमण्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र दिसते आहे. व त्याचे विघातक परिणाम मानवी जीवनावर होत आहे. हा असमतोल नाहीसा होऊन पर्यावरण संवर्धनासाठी चिमणी जगली पाहिजे या हेतूने २० मार्च २०१० पासून संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक चिमणी दिनानिमित्ताने चिमण्यांची संख्या वाढण्यासाठी तसेच त्यांचे जगणे अधिक सुखकर होण्यासाठी व पशु, पक्षी, प्राणी व निसर्गाची आपल्या जीवनातील मोलाची भूमिका समजून घेऊन या संदर्भाने जनजागृती होऊन वसुंधरेवरील जैवविविधता सुरक्षित राहण्याच्या अनुषंगाने विविध विधायक उपक्रम राबविले जावेत अशी अपेक्षा असते. जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत देऊळगावराजा हायस्कूल देऊळगावराजा चे राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख, पर्यावरण प्रेमी वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी शाळेतील तथा समाजातील पर्यावरण व पक्षीप्रेमींना खास करून पक्षांसाठी बनवलेले मातीचे ११० जलपात्र व घरट्यांचे वितरण करून प्रत्येकाने पक्षी संवर्धनाचा वसा घेण्याचे आवाहन केले.

वनश्री जनाबापू मेहेत्रे व त्यांचे पर्यावरणप्रेमी सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून सिंदखेडराजा व देळगावराजा परिसरात विविध प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम राबवित आलेले आहेत. त्यांच्या पर्यावरण संवर्धनासाठीच्या विविध उपक्रमांची समाजात नेहमी वाहवा होत असते. हे विशेष !