Home महत्वाची बातमी सिमेंट कंपन्यांनी हॅन्ड वॉश केंद्र उभारावे – आशिष देरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी….!

सिमेंट कंपन्यांनी हॅन्ड वॉश केंद्र उभारावे – आशिष देरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी….!

197

प्रतिनिधी – मनोज गोरे

सीएसआर निधी अंतर्गत सिमेंट कंपन्यांकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठिकठिकाणी हँडवॉश केंद्र उभारण्यात यावे. तसेच प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांना मास्क पुरविण्याची मागणी जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कोरपना तालुक्यात माणिकगड, अल्ट्राटेक व अंबुजा असे एकूण तीन सिमेंट कारखाने सद्यास्थितीत सुरु असून उत्पादन सतत सुरु आहे. सिमेंट कंपन्यांमुळे गडचांदूर,
नांदाफाटा, बिबी, आवारपूर, उपरवाही, अंबुजा फाटा इत्यादी ठिकाणी परराज्यातून ट्रक चालक व वाहक हजारोंच्या संख्येने ये-जा करतात. मात्र त्यांच्या तपासणीची कसलीही व्यवस्था या ठिकाणी नाही.
सद्या जगात कोरोनाने धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये कमालीची दहशत आहे.
सिमेंट कंपन्यांच्या वर्दळीमुळे परिसरातील गावांना धोका निर्माण झाला आहे. कंपन्यांनी परिसरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्याकडून कोणतीही पाऊले अजूनपर्यंत उचलल्या गेली नाही.
सिमेंट कंपन्यांनी सीएसआर निधीचा वापर करून गडचांदूर, नांदाफाटा, बिबी, आवारपूर, उपरवाही, अंबुजा फाटा इत्यादी व इतरही परिसरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठिकठिकाणी हॅन्ड वॉच केंद्र उभारावे व त्या ठिकाणी त्यांनी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच ट्रक चालक, वाहक व परिसरातील गावकऱ्यांसाठी सीएसआर निधी अंतर्गत मास्क पुरविण्यात यावे. यासाठी आपण पुढाकार घेऊन कंपन्यांना विनंती वजा आदेशित करावे अशी मागणी जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच आशिष देरकर यांनी जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती खासदार बाळू धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांना पाठविण्यात आल्या आहे.