
शिरीहरी अंभोरे पाटील
हिंगोली :
कोरोना या विषाणूजन्य आजाराचा कपडा मार्केटला ही फटका बसला आहे. आठवडाभरापूर्वी दिवसाकाठी चाळीस हजार रुपये होणारी कपडा विक्रीची उलाढाल दोन दिवसापांसून अवघ्या पंधरा हजार रुपयांवर आली असल्याचे क्लासीक साडी सेंटरचे प्रविण गुंडेवार यांनी सांगितले.
सध्या लगीन-सराईची धामधूम असल्याने कपडे खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील आठ दिवसांपासून कोरोना आजार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात पसरला असल्याचे विविध माध्यमांद्वारे सांगितले आहे.











































