Home बुलडाणा विधुत महावितरण कंपनी चा भोंगळ कारभार , विज बिल वेळेवर भरून...

विधुत महावितरण कंपनी चा भोंगळ कारभार , विज बिल वेळेवर भरून सुद्धा ही केला विधुत पुरवठा खंडीत ,

904

दोषींवर कार्यवाही ची मागणी ,

अमीन शाह

बुलडाणा

मलकापुर येथे विजवितरण कंपनीच्या वसुलीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी ग्राहकाने विज बिलाचा भरणा केल्यावरही लाईट कट केली..यावर ग्राहकाने भरलेल्या बिलाची पावती दाखवित लाईट कट करण्याचे कारण विचारले असता अर्वाच्य भाषेचा वापर केल्याची घटना घडली.अरेरावी करणाऱ्या या म.रा.वि.वि.कंपनीच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ यांनी केली आहे.
मलकापुर येथे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या वतीने वसुलीसाठी आले असता ४० बिघा परिसरातील दिपक सदाशिव नाफडे यांनी आपण मुदतीच्या आत बिलाचा भरणा केला असल्याची सांगुन पावती ही दाखविली.मात्र अधिकाऱ्याने ग्राहकाचे एक न ऐकता लाईट कट केली..तसेच यावर दिपक नाफडे यांनी विज वितरण कंपनीच्या कार्यालय गाठून अधिकाऱ्यास विचारणा केली असता अधिकाऱ्यांने ग्राहकास उध्दट भाषेचा वापर करित कार्यालयाबाहेर काढले.
दिपक नाफडे यांची आई आजारी आहेत तसेच मुलींचे सुध्दा 10 वी ची परीक्षा सुरू आहे..आणी त्यांनी मुदतीच्या आत बिलाचा भरणा केला असल्याने त्यांनी अधिकाऱ्याला वारंवार विनंती केली..मात्र अधिकाऱ्याने वारंवार उध्दट भाषेचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे..

तर या घटनेची माहिती ललिता नाफडे यांनी नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांना दिली. व आपणासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला असुन अॅड.हरीश रावळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महावितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलनाचा इशारा दिलाय…त्वरित दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मंगणी परिसरातील ग्राहकांनी केली आहे ,

मुलीची परीक्षा ,

ज्या विधुत ग्राहकाचा विधुत पुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यांच्या येथे मुलीची दहावी ची परीक्षा सुरू असून लाईट नसल्या मुळे त्या विद्यर्थिनी ला दिवा लावून अभ्यास करावा लागत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा तिरव सवरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा मलकापूर चे कर्तवयदक्ष नगराध्यक्ष ऍड , हरीश रावळ यांनी दिला आहे ,