Home बुलडाणा कन्येचा विवाह सोहळा कौटुंबिक स्वरूपात साजरा करणार…. माननीय आमदार डॉ. शशिकांत खेडेकर...

कन्येचा विवाह सोहळा कौटुंबिक स्वरूपात साजरा करणार…. माननीय आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांचे स्वागतार्थ निर्णय ,

331

रवि आण्णा जाधव

देऊलगावराजा ,

वसंताला जाग आली आहे… अमराई सुद्धा नादावली आहे… पळसाच्या देठाला फुलण्याची आणि हळदीला गालावर चढण्याची घाई झाली.. मांडवा सजलाय… वर – वधूकडील मंडळी सज्ज आहेत… पंचक्रोशीतील आप्तेष्ट मंडळीना घरासह आवतन धाडण्यात आले आहे… राज्यभरातील स्नेहजनाना आमंत्रणे देऊन झाली आहेत… लग्नसोहळा धूम धडाक्यात व्हावा यासाठी लग्न मंडप, मंगल कार्यालय, हजारो निमंत्रांचे भोजन नियोजन इत्यादी सर्व, सर्व व्यवस्था चोख पणे करण्यात आली पण ऐन वेळेला कोरोना व्हायरस ने जगभरात धुमाकूळ घातला… महाराष्ट्रात ही हा व्हायरस थैमान घालण्याचा धोका लक्षात घेता एकुलत्या एक मुलीच्या लग्न सोहळा कौटुंबिक स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय सिंदखेड राजा चे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी जाहीर केला आहे. आता आमच्या घर लग्न सोहळ्याला भव्य-दिव्यतेचा साज चढविण्याला मूरड घालण्याशिवाय पर्याय नसून गुरुवार दि. १९ मार्च रोजी होणाऱ्या या विवाहाला जिथे असाल तिथूनच शब्द किंवा संदेश द्वारे शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात असे आव्हान वधूपिता डॉ.शशिकांत खेडेकर आणि त्यांचे व्याही माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले आहे.
कोरोनाच्या तांडवा मुळे त्यांची मुलगी चि.सौ.कां. डॉ. वैष्णवी आणि व्याही माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे सुपुत्र ची. परीक्षित यांचा विवाह सोहळा थोडक्यात करण्यात येणार आहे. कोरोनाने भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आपले पाय पसरण्यात सुरुवात केली आहे. अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. शाळा-महाविद्यालय, मॉल, सिनेमागृह, गार्डन, मंदिरे बंद करण्यात आली आहेत. युद्धस्तरावर यंत्रणा कोरोनाच्या मुकाबला करीत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे त्यामुळे ह्या संसर्ग फैलाव रोखण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांची पत्नी डॉ. उषाताई खेडेकर यांची सून तसेच सुकन्या वैष्णवी डॉक्टर असल्याने खेडेकर कुटुंब आरोग्य क्षेत्रात काम करणारे आहेत. खेडेकर परिवार नेहमीच सामाजिक जबाबदारीची जाण व भान ठेवून आयुष्यात जगत आला आहे. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हे बाळकडू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाले असल्याचे डॉ. शशिकांत खेडेकर अभिमानानं सांगतात. या सर्व अनुषंगाने चि. सौ.कां. डॉ. वैष्णवी आणि परिक्षित यांचा विवाह गुरुवार दि.१९ मार्च रोजी होणारा आहे. विवाह कौटुंबिक स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय खेडेकर परिवार आणि जगताप परिवारांनी घेतला आहे. या नवदांपत्यांना जिथे असाल तिथूनच शुभाशीर्वाद द्यावेत अशी विनंती डॉ. उषाताई आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केली आहे. सामाजिक दृष्टीकोनातून घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. कोरोनाच्या फैलाव पाहता खेडेकर आणि जगताप परिवाराने उचललेले हे पाऊल अनेकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. यात काही शंका नाही इतर ठिकाणीही आदर्श कित्ता गिरवावा अशी मागणी उठत आहे.