Home विदर्भ दोन कन्टेनरच्या धडकेत कन्टेनर पलटुन चालक ठार

दोन कन्टेनरच्या धडकेत कन्टेनर पलटुन चालक ठार

79
0

राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटातील घटना

वर्धा जिल्ह्यातील आष्टि तालुका येथील तळेगांव शामजी पंत येथील नागपुर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटातील वळनावर ५:३० वाजताच्या सुमारास नागपुर वरुन मुंबईला ट्रक क्रं. MH. 04 JK 8069 पाॅलिस्टर यार्न घेवुन जात असता अनियंत्रित होवुन दुभाजकाला अोलांडुन अमरावती कडुन नागपुरला ट्रक क्रं. MH 43 Y 8390 केमीकल घेवुन जात असलेल्या ट्रक ला धडक देवुन रोडच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर पलटला असता त्या खाली दबुन चालक संतोषकुमार पलटु मिसाद वय २३ वर्ष रा मदनपुर यु.पी. जागीच ठार झाला.

त्यातील क्लिनर राप्रसाद हरीराम मिसाद वय २७ वर्ष हा किरकोळ जखमी झाला असुन दुसर्‍या कन्टेनरचा चालक नागेश चंदु कोकरे रा. मुंबई हा सुदैवाने बचावला. सदर घटनेची माहीती तळेगांव पोलीसांना मिळताच घटनास्थळी दाखल होवुन क्रेनच्या साहय्याने मृतकाला बाहेर काढुन उत्तरीय तपासनीकरीता ग्रामीन रुग्णालयात पाठविण्यात आले असुन पुढिल तपास तळेगांव पोलीस करीत आहे.

इकबाल शेख सह रविन्द्र साखरे 9834453404 / 9890777242