
सिने स्टाईल पाठलाग करून केली कार्यवाही ,
शरीफ शेख
जळगाव
MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल सोनवणे यांनी धडाकेबाज कार्यवाही करत म्हसावद दुरक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बोरनार येथे 15/03/2020 रोजी रात्री 9.30 वा. अवैध वाळू वाहतूक वाहतूक करणारे 1 ट्रॅक्टर एम एच 19 PY O441 चालक विष्णू किसन ठाकूर रा.बोरनार व मालक प्रेमराज प्रभाकर पाटील रा.बोरनार ता.जि. जळगांव तसेच 2) ट्रॅक्टर क्रमांक एम एच 19- AP-6213 चालक समीर सलीम पटेल व मालक सुनील मधुकर धमोळे असे चोरटी वाळूची वाहतूक करतांना मिळून आलेले आहे, सदर कारवाई ही पो. उप.निरी.विशाल सोनवणे, पोहेकॉ/195 शशिकांत पाटील, पोकॉ/1734 समाधान पाटील, पोकॉ/2161 हेमंत पाटील यांनी केली.सदर ट्रॅक्टर चालक यांना ताब्यात घेण्यात आले असून सदरची कारवाई ही एकूण वाळू सहित 8,20,000/- असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.