Home मराठवाडा सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच घेणाऱ्यास रंगेहाथ अटक ,

सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच घेणाऱ्यास रंगेहाथ अटक ,

50
0

-तहसील कार्यालयातील लिपीक अटकेत

अब्दुल कय्युम

औरंगाबाद : सातबा-यावर नाव लावण्यासाठी त्यापुर्वी दिलेले चुकीचे पत्रक पुन्हा दुरूस्त करण्यासाठी एक हजारांची लाच स्विकारलेल्या सोयगावच्या तहसील कार्यालयातील लिपीकाला मंगळवारी (दि.१७) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. राम रघुनाथ मुरकुटे (वय ४२) असे त्याचे नाव आहे. सोयगाव तालुक्यातील ढालसिंगी येथील ५४ वर्षीय शेतक-याने त्याच्या भावाचे नाव सातबा-यावरुन कमी केले होते. ते पुन्हा लावण्यासाठी यापुर्वीचे चुकीचे पत्रक देण्यात आले होते. त्यावेळी तक्रारदाराकडून त्याने पाचशे रुपयांची लाच स्विकारली होती. आता पुन्हा पत्रक दुरूस्ती करुन देण्यासाठी त्याने एक हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे शेतक-याने औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्विकारताना मुरकुटेला रंगेहाथ पकडले.