Home मराठवाडा औरंगाबादमध्येही महिलेला निघाला कोरोना, सगळीकडे उडाली खळबळ

औरंगाबादमध्येही महिलेला निघाला कोरोना, सगळीकडे उडाली खळबळ

235

राज्यातील रुग्णांची संख्या ३२ वर

अब्दुल कय्युम

औरंगाबाद ,

मुंबई, पुणे, नागपूर,

अहमदनगरपाठोपाठ औरंगाबादमध्येही करोनाचा रुग्ण आढळला आहे. औरंगाबादमधील हा पहिलाच करोनाचा रुग्ण असून राज्यातील करोना रुग्णांची संख्या ३२ वर तर देशातील रुग्णांची संख्या १००वर पोहोचली असल्याचे वृत्त आहे.

उपलब्ध माहितीनुसार औरंगाबादमध्ये एका ५९ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. या महिलेचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला विलगीकरण कक्षात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. सदर महिला रशिया आणि कझाकिस्तानचा प्रवास करून आली असल्याचे सांगण्यात येत. या महिलेला धूत रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये करोनाचा पहिलाच रुग्ण आढळल्याने येथील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान या घटनेनंतर ही महिला ज्या लोकांच्या संपर्कात आली होती, त्या सर्वांची माहिती घेण्यात येणार असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या महिलेच्या कुटुंबीयांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राज्यातील रुग्णांची संख्या आतााा ३२ हून अधिक झाली असून यामध्येपुणे येथे १५, मुंबई ५, रायगड १, कल्याण १, अहमदनगर १, नागपूर ४, ठाणे १, यवतमाळ २, नवी मुंबई १ आणि औरंगाबाद १ असे एकूण ३२ रुग्ण आढळून आले आहेत. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. तसेच नागरिकांना मॉल, बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच कारण नसताना प्रवास न करण्याचे आवाहनही केले आहे.