Home विदर्भ दिवसा ढवळ्या बँकेच्या समोरून वृद्धांची 65 हजार रुपये असलेली पिशवी चोरट्यांनी लांबवली

दिवसा ढवळ्या बँकेच्या समोरून वृद्धांची 65 हजार रुपये असलेली पिशवी चोरट्यांनी लांबवली

88

तक्रार दाखल

जीवन महाजन

नंदुरबार – चोरट्याने मारला 65 हजरांचा डल्ला , शहरातील डॉ.अंधारे यांच्या दवाखान्या समोर असलेली बँक ऑफ बडोदाच्या बाहेरील भागात 65 हजार रुपयाची रक्कम घेऊन वृद्ध व्यक्ती बसलेला होता बँक ऑफ बडोदा येथून सुमारे 65 हजार रुपये रक्कम त्याच्या जवळ असलेल्या पिशवीत त्याने ठेवली एटीएम

च्या खाली ओट्यावर बसल्या असतांना त्याचा मुलगा बाजारात जाऊन येत नाही तोपर्यंत तो चिलम पीत बसला असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या या संधीचा फायदा घेतला हातातून 65 हजार रुपये असलेली पिशवी लहान मुलांच्या मदतीने पसार केली अज्ञात चोरट्यांनी दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास समारे 65 हजार रुपयाची पिशवी भरचौकात घडल्याने संपूर्ण शहरात ह्या घटनेने खळबळ माजली होती सदर घटनेतील आरोपींचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज घेण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याने सदर चोरट्याचा तपास लागावा म्हणून बँकेच्या एटीएम परिसरात असलेल्या कॅमेराद्वारे चित्रित झालेल्या फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा हा बँकेने बसविणे बँकेकडून बसविण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे चोरी करणाऱ्याचा पाठपूरावा बँकेतून बाहेर पडणाऱ्या ओळखणे अवघड होऊन बसल्याने यावर बँकेने देखील उत्कृष्ट प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे तसेच एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक व बँकेच्या दारावर देखील सुरक्षारक्षक ठेवणे गरजेचे झाले आहे जर नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्वच बँकांच्या एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक तसेच बँकेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक व बँकांच्या सीसीटीव्ही यांच्या कॅमेऱ्यांची दर्जा हा उच्च प्रतीचा असने गरजेचे आहे जेणेकरून सीसीटीव्ही फुटेज मधून चोराचा अथवा अन्य गोष्टीचा छडा लागण्यासाठी योग्य चित्रीकरण होणे तेवढेच महत्त्वाचे असल्याने त्यावरून चेहऱ्याची स्पष्टता होऊन आरोपीस शोधणे शक्य होते यामुळे या परिसरात घटना घडल्यानंतर परिसरातील सतर्क जनतेने या घटनेच्या आरोपीस व ईतरांस शोधण्याचा बराच प्रयत्न केला परंतु ही घटना घडली त्यावेळी सुज्ञ नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेही आरोपीचा तपास न लागल्याने शेवटी या घटनेची खबर वेला भाई मायाभाई भरवाड राहणार भादवड न्याहली जिल्हा नंदुरबार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली असून याबाबत पोलिस तपास सुरू आहे.
—————————————