Home मराठवाडा कन्नडचे माजी आमदार आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत...

कन्नडचे माजी आमदार आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

566

अब्दुल कय्युम

औरंगाबाद :- कन्नडचे माजी आमदार आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
अदालत रोडवरील क्रांतीनगर सिग्नलवर शनिवारी सायंकाळी सहा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी नितीन रतन दाभाडे (वय ३० रा. बनेवाडी) यानं तक्रार दाखल केली. दाभाडे याने क्रांतीनगर सिग्नलवर पानटपरी टाकून त्याच्यावर निळा झेंडा लावला होता. जाधव यांनी ही पानटपरी काढण्यास सांगितली होती. पानटपरी न काढल्यास ठार मारण्याची धमकी दिली व जातीवाचक शिवीगाळ केली, असं दाभाडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. दाभाडे याच्या तक्रारीवरून हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छावणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणाजी सावंत या प्रकरणी तपास करीत आहे.
हर्षवर्धन यांचा खुलासा ‘मी शिवसेनेविरोधात राजकीय भूमिका घेतल्यानं माझ्याविरोधात ही कटकारस्थानं केली जात आहेत. मात्र, मला तुरुंगात टाकलं तरी शिवसेनेच्या विरोधात आवाज उठवतच राहणार,’ असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.