
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
जालना , दि. १६ :- महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे राष्ट्रीय अधिवेशन जालना जिल्ह्यामध्ये उत्साहात पार पडले या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये पोलिस प्रशासनातील व समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉक्टर संघपाल ऊमरे, मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी परभणी जिल्हा अध्यक्ष सौ रेखाताई मनेरे आणि जालना जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक नितीन जैस्वाल व राष्ट्रीय वक्ता श्री रनबावळे पत्रकार अजहर शेख यांच्यासह शरद कवानकर, विजय सुरासे, गौरव बुटे, गोपाल बुटे , हबीब परसू वाले यांची प्रमुख उपस्थिती होती.











































