
ना.सदाभाऊ खोत विधानपरिषदेत बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांचे पितळ उघडे पाडणार
अमीन शाह
बुलडाणा , दि. १५ :- बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र काढून शासकीय सेवेचा गैरवापर केला जात असल्याबाबतच्या तक्रारी वेळोवेळी शासनदरबारी शेतकरी नेते प्रशांत ढोरे पाटील व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे स्विय सहाय्यक सचिन वखरे व दत्ता खान्डेलवाल यांच्या सततच्या पाठपुराव्याने मा. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत या संदर्भात तारांकित प्रश्न क्र. २१७ द्वारे महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे.
विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत दिव्यांगांच्या बोगस प्रमानपत्रासंदर्भात महत्वपूर्ण असा तारांकित प्रश्न उपस्थित करून त्यात त्यांनी खास करून बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्हा परिषद अंतर्गत काही कर्मचारी व अधिकारी खास करून शिक्षकांमध्ये दरवर्षी बदली व पदोन्नतीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत असून मोठ्या प्रमाणात दिव्यांग बोगस प्रमाणपत्र काढून शासकीय सेवेचा गैरवापर केला जात असल्याच्या तक्रारी वेळोवेळी रयत क्रांती संघटना व शिक्षकसेना यांनी प्रशासनाकडे लावून धरलेली आहे या प्रकरणी शासनाने आजवर कोणती चौकशी केली, चौकशीच्या अनुशगांने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या दोषीविरुद्ध तसेच त्याचा वापर करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली अथवा काय चौकशी करण्यात येत आहे,जर कारवाई केली नसल्यास चौकशीसाठी इतक्या विलंबाची कारणे काय आहेत या प्रस्तुत प्रश्नांसंदर्भात सर्व मुद्यांची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात सविस्तर टिप्पणीसह संबंधीत कागदपत्राच्या प्रतिसह शासनास ईमेलद्वारे अथवा स्पीडपोस्टाने बिनविलन सादर करावी असे आदेश जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहेत व खास करून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग प्रमानपत्राचा वापर होत असल्याने ज्यांच्यावर बदली व पदोन्नतीने अन्याय झाला असेल त्यांनी या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र लाभार्थ्यांचे पुरावे आमच्या कडे prashant patil20283@gmail.com या इमेल वर किंवा 7507759777 या व्हाट्सअप्प नंबरवर लवकरात लवकर सादर करावे आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आव्हान प्रशांत ढोरे पाटील यांनी केले आहे.











































