Home आध्यात्मिक संत गजानन महाराज प्रकट दीनानिमित्त मुस्लिम समाजाने दिला माणुसकीचा परिचय

संत गजानन महाराज प्रकट दीनानिमित्त मुस्लिम समाजाने दिला माणुसकीचा परिचय

46
0

जमीयते उलेमा हिंदच्या वतीने भक्तकांच्या सेवेसाठी पुढाकार

देवानंद खिरकर – अकोट

ब्रम्हांडनायक संत गजानन महाराज भविकांचे श्रध्दास्थान महाराजांचा आज प्रकट दिन आहे मुखी गण गण गणात बोते… गजानना अवलिया अवतरले जग ताराया … हे भजन गात पावले आपसुक श्री क्षेत्र शेगावच्या मार्गाने अकोट मोहाळा वरुन जात असलेल्या वारकरी व चिमुकल्या मुलांपासून आबालवृध्द महिला तरुणसुध्दा पायदळ वारकरी व भक्तकांना मोहाळा येथील जमीयते उलेमा हिंदच्या पुढाकाराने एक खऱ्या अर्थाने हिन्दू मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडले मुस्लिम समाजानी खरच माणुसकीचा परिचय देऊन चहा पानी नास्ता अल्पोहर पहाटे ४ वाजतापासून भक्तकांच्या सेवेसाठी स्वताहुन त्यांना थांबुन वाटप केला अश्यातच अकोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे अकोट ग्रामीण पो स्टेचे ठाणेदार ज्ञानोबा फड़ यांनी सुध्दा सहभाग घेऊन मुस्लिम समाजाचे भरभरून कौतुक केला याप्रसंगी मौलवी सदरूद्दीन मौलवी आसिफ खा हाफिज शरीफोद्दीन हाफिज कलिमोद्दीन मौलवी शेख असगर हाफिक अब्दुल लतीफ हाफिज अब्दुल मुजीब मौलवी अनसरोदिन मौलवी जियाहुन रहेमान हाफिक अब्दुल रफीक दानिश पटेल साकिब पटेल सलिम खान शाकिर खान पर्यावरण प्रेरणा समिती चे अध्यक्ष जावेद अली मिरसाहेब सामाजिक कार्यकर्ता साजिद खान पठान डॉ आतिफ पटेल सुफियान अहमद हरिदास आखरे दिनेश नेरकर रामा वानखड़े यांच्यासह जमीयते उलेमा हिंद व गावकरी मंडळीने सहभाग घेतला होता या संत गजानन महाराजांच्या प्रकट दीनानिमित्त वारक-यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरु सोबत गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या…

Unlimited Reseller Hosting