
फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस ठाणे मालेगांव हददीत दि. 14/06/2026 रोजी मालेगांव ते मेहकर रोडवरील मेहकर बायपास येथे अवैध वाहतुकीवर कारवाई करत असतांना मालेगांव पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार महेश यलगया जाधव आणि उमेश म्हस्के यांना एक संशयीत तिनचाकी ऑटो क्र. एमएच 28 टी 3884 हे मेहकर कडुन येतांना दिसले. सदर वाहन थांबवुन वाहतुक
अंमलदार महेश जाधव यांनी त्यांचेकडील चालान मशीनवर सदर वाहनाचा नंबर टाकुन तपशील चेक केला असता प्रत्यक्षातील वाहन आणि रेकॉर्डवरील वाहन याचे तपशीलामध्ये
तफावत आढळल्यामुळे सदर वाहन त्याचा चालक नामे शेख सोहील शेख शकील, वय 24 वर्ष,रा. मेहकर, ता. मेहकर, जि. बुलढाणा यांचेसह ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यास आले व संशयीत
वाहनावर कलम 124 म.पो. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचे वाहन जप्त करण्यात आले असुन पोलीसांच्या चालान मशीनवर आलेल्या रेड अलर्टनुसार चेक केले असता
सदर वाहन चोरीबाबत पोलीस ठाणे एमआयडीसी भोसरी, जिल्हा पींपरी चिंचवड येथे गु.र.नं.21/2017 कलम 379 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती प्राप्त असुन पुढील तपास पोहवा किशोर चिंचोळकर हे करत आहेत.














































