Home यवतमाळ रोहित पवार यांच्या समर्थनार्थ…!

रोहित पवार यांच्या समर्थनार्थ…!

150
कळंब तालुका प्रति :-विरेंद्र चव्हाण
कळंब :-शेतकरी हिताच्या विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी युवा कार्याध्यक्ष विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस(SP )मा. मनीषा ताई काटे यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ व महत्त्वाच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक अन्नत्याग आंदोलन बाबत तहसीलदार कळंब यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. दिनांक : १५ जून २०२६ (सोमवार) : सकाळी १२:३० वाजता: तहसील कार्यालय कळंब येथे
==*”शेतकरी वाचला तरच देश वाचेल*!”
या आंदोलनात शेतकरी,शेतमजूर,युवक, महिला,व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अन्नदात्याच्या संघर्षाला बळ द्यावे,असे युवा कार्याध्यक्ष विदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस(SP )च्या मनीषा ताई काटे यांनी केले आहे.