Home यवतमाळ गावठी बनावटीचा देशी पिस्टल बाळगणाऱ्या इसमास अटक व पिस्टल (अग्नीशस्त्र) व दोन...

गावठी बनावटीचा देशी पिस्टल बाळगणाऱ्या इसमास अटक व पिस्टल (अग्नीशस्त्र) व दोन जिवंत काडतुस असा एकुन 52,000/- रुपयाचा माल जप्त…!

119
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध्य शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणाऱ्या तसेच गुंगीकारक औषधी द्रवाची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता साहेब (भापोसे) व उपविभागीय पोलीस अधिकारी वणी सा. यांनी आदेशीत केले होते त्याच अनुशंगाने सपोनि संतोष मनवर ठाणेदार शिरपुर यांनी त्याचे अधिनस्थ पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांना गोपनीय माहीती काडुन प्रभावी छापा करणे बाबत सुचना दिले आहे.
पो.स्टे. शिरपुर हद्दीत दिनांक 13/06/2026 रोजी रात्री 21/45 वा, सुमारास इसम नामे शाहरुख गुलशेर खान वय-31 वर्ष हा मुंगोली खदान परीसरात चोरीच्या उद्देश्याने देशी कट्टा बाळगुन असल्याचे माहीती मिळताच पोस्टॉप मिळालेल्या माहीती प्रमाने मुंगोली परीसरात गेले असता इसम नामे शाहरुख गुलशेर खान वय-31 वर्ष रा. आमराई वार्ड 2 घुग्घुस ता.जी चंद्रपुर हा मौजा मुंगोली ते वर्धा नदीचे पुलाजवळ संशयास्पद रित्या वावरत असतांना दिसुन आल्याने त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचे कमरेला खोचुन एक अग्नीशस्रत्र (देशी कट्टा) किमंत 50,000/- रुपये व दोन जिवंत काडतुस किंमत एकून 2,000/- रुपये असा एकुन 52,000/- रुपये मुद्देमाल जप्त करुन ताब्यात सदर आरोपीवरुध्द कलम 3/25 शख अधीनीयम सहकलम 135,123 मपोका अन्वये गुन्हा नोंद करुन कार्यवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा.श्री. कुमार चिंता साहेब पोलीस अधीक्षक, यवतमाळ. मा.श्री. अशोक थोरात साहेब अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. सुरेश दळवे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे शिरपुर येथील सपोनि / संतोष मनवर ठाणेदार शिरपुर पोउप‌नि/धिरज गुल्हाने, पोहेकॉ सुनिल दुबे, पोहवा/अविनाश वानकर पोहवा इकबाल शेख पो. काँ पंकज कुडमेथे पो. काँ दिपक वाकडे, पो.कॉ किरण दासरवार पो. काँ प्रफुल नाईक यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.