Home वाशिम स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांची गोवंशाची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई

स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांची गोवंशाची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई

96

 

फुलचंद भगत
वाशिम:-वाशीम जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयात अवैधरित्या गोवंश वाहतुकीवर कडक कारवाईच्या सुचना केल्या आहेत…… त्यानुसार दिनांक 12/04/2026 रोजी दोन ट्रकमधुन गोवंशाची वाहतुक हो असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखा वाशिम ला मिळाल्यावरुन सकाळी 05.30 च्या दरम्यान ग्राम कळंबा महाली, वाशिम मंगरुळपीर रोडवर सापळा रचुन संशयीत वाहन क्रमांक MH 04 FU 5246 व MH 44 440 यांना अडवुन तपासणी केली असता, सदर वाहनांमध्ये निर्दयीपणे कोंबुन ठेवलेले गोंवश/बैल आढळुन आले. प्राण्यांना वाहतुकी दरम्यान कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच आवश्यक कागदपत्रे नसतांना वाहतुक केली जात असल्याचे निदर्शनास आले. या कारवाई दरम्यान एकुन 30 बैल / गोवंश जनावरे तसेच 2 ट्रक वाहने असा एकुन अंदाजे 40,50,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी 1) सैय्यद अफजल सैय्यद सालार वय 29 वर्ष रा. रशीदनगर, दिवाणपुरा, मंगरुळपीर जि. वाशिम 2 ) नाजीमोद्दीन निजामोद्दीन वय 42 वर्ष रा. चहेलपुरा, मंगरुळपीर असे सांगितले वरुन संबधीत आरोपीतांविरुध्द विविध कलमांन्वये गुन्हा पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अनुज तारे, यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड, पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश बांगर स्थानिक गुन्हे शाखाचे,पोलीस उपनिरीक्षक शेखर मास्कर स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम व टीम आणी अथकाने परिश्रम करुन केली आहे.जिल्हयात अवैध कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशी हालचालींबाबत त्वरीत पोलीसांना माहिती दयावी असे आवाहन पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी केले आहे.