Home यवतमाळ नगर परिषद यवतमाळ येथे कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत तीव्र आंदोलन

नगर परिषद यवतमाळ येथे कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाबाबत तीव्र आंदोलन

286

यवतमाळ – नगर परिषद यवतमाळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात आहे. एकाच कंत्राटदाराला वारंवार कामे देण्यात येत असून हे कंत्राट प्रस्थापित नेत्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने करण्यात येत आहे.

यवतमाळ येथील आरोग्य विभागामार्फत कुली, सफाई, झाडाझुड व कचरा संकलन करणाऱ्या कामगारांचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून शोषण सुरू आहे. संबंधित कामगारांकडून कठोर मेहनत करून घेतली जात असली तरी त्यांना नाममात्र केवळ रुपये 7,000 ते 8,000 इतकाच अपुरा पगार दिला जात आहे.

परंतु नगर परिषदेमार्फत किमान वेतनानुसार पगाराचे देयक बिल काढले जात असल्याने, दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात येत आहे. हा भ्रष्टाचार संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने होत आहे.

या अन्यायाविरोधात कामगारांच्या वतीने अनेक वेळा आंदोलन करण्यात आले, तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. दिनांक ११/०३/२०२६ पासून नगरपरिषद समोर कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू असून आजपर्यंत कोणत्याही संबंधित अधिकारी किंवा कंत्राटदाराने आंदोलनकर्त्यांची भेट घेतलेली नाही. तसेच कामगारांच्या मागण्या दिनांक २०/०३/२०२६ पर्यंत मान्य न झाल्यास, संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष संजय सदाशिव मिश्रा यांनी प्रसिद्धी पत्रकारांद्वारे दिला आहे.