Home यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून गुढीपाडवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा

पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून गुढीपाडवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा

252

यवतमाळ  –  गुढीपाडव्याच्या मंगलमय पर्वावर आज गुरूवारी राज्याचे मृद वजलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ येथील निवासस्थानी गुढी उभारून नागरिकांना सुख, समृद्धी आणि निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. हिंदू नववर्ष सर्वांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो, अशी प्रार्थना मंत्री संजय राठोड यांनी यावेळी केली. याप्रसंगी पोहरादेवी येथील महंत श्री जितेंद्र महाराज, जिल्हा बँकेचे संचालक राजुदास जाधव यांच्यासह कुटुंबीय, कौटुंबिक स्नेही आदी उपस्थित होते.