
फुलचंद भगत
वाशिम:-होळी हा आनंदाचा सण जेव्हा सामाण्य नागरीक मोठ्या ऊत्साहाने साजरा करत होते तेव्हा खाकी वर्दीतील हजारो चेहरे मात्र नेहमीप्रमाणेच रस्ते, चौक आणि पोलीस ठाण्यांमध्ये आपल्या कर्तव्यावर तैनात दिसले. समाज जेव्हा सुखाने सण साजरे करतो, तेव्हा त्या आनंदामागे आणि शांततेमागे पोलीस दलाचा अहोरात्र सुरू असलेला संघर्ष कारणीभूत असतो.सदैव जनतेच्या रक्षणार्थ कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाच्या जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे आपण जनतेचे सेवक आणी रक्षण करणारे सैनिक आहोत असे मत मंगरुळपीर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार किशोर शेळके यांनी होळी सणाच्या बंदोबस्तावरुन परतलेल्या आपल्या सैनिकांचे मनोबल आणी आनंद वाढवणार्या छोट्याशा कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले तसेच सर्व पोलिसबांधवांना यावेळी फराळ आणी मिळाईचे वाटपही केले.
केवळ गुन्हेगारी नव्हे, तर माणुसकीचेही रक्षणही पोलीसांना करावे लागते.पोलीस दलाचे काम केवळ गुन्हे दाखल करणे किंवा कायदा-सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. अपघाताच्या वेळी देवदूत बनून धावून जाणे, हरवलेल्या मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून आणणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर राहणे आणि सायबर गुन्ह्यांच्या विळख्यातून नागरिकांना वाचवणे अशा अष्टपैलू भूमिका पोलीस पार पाडत आहेत. नैसर्गिक आपत्ती असो वा आणीबाणीचा काळ, मदतीसाठी पहिला हात खाकी वर्दीचाच पुढे येतो.आव्हाने वाढली, तरीही पोलीस सक्षम आहेत.बदलत्या तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांचे स्वरूप आता ‘डिजिटल’ झाले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी पोलीस दल आधुनिक यंत्रणांनी सज्ज होत आहे. मात्र, ही प्रगती होत असतानाच मनुष्यबळाची कमतरता, कामाचा वाढता ताण आणि वाढते मानसिक दडपण ही आव्हाने आजही पोलिस दलासमोर उभी आहेत. या प्रतिकूल परिस्थितीतही पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चोख बजावत आहेत.
*स्वतःचे घर मागे, समाजाचे रक्षण पुढे*
पोलीस कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सण, वाढदिवस किंवा कौटुंबिक सुख या गोष्टी नेहमीच दुय्यम ठरतात. स्वतःच्या कुटुंबाला वेळ देण्याऐवजी समाजाचे रक्षण करणे महत्त्वाचे मानणाऱ्या या योद्ध्यांचा वैयक्तिक संघर्ष अनेकदा पडद्यामागेच राहतो. ‘ड्युटी’ हेच त्यांचे पहिले घर आणि कर्तव्य हाच त्यांचा धर्म बनतो.नागरिक म्हणून आपण कायद्याचे पालन करणे, तपासात पोलिसांना सहकार्य करणे आणि त्यांच्या कामाचा आदर करणे, हाच त्यांच्यासाठी खरा सन्मान ठरेल.












































