Home यवतमाळ जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत लक्ष्यजित ठाकरे जिल्ह्यात प्रथम

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत लक्ष्यजित ठाकरे जिल्ह्यात प्रथम

197

यवतमाळ: जिल्हा परिषद शिक्षण विभाग, यवतमाळच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा तळेगाव येथील लक्ष्यजित अक्षय ठाकरे याने बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. ६ ते ११ वर्षे वयोगटात लक्ष्यजितने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा आणि तालुक्याचा नावलौकिक वाढवला. लक्ष्यजितला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, सायकल, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

नेहरू स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्यजितला बुद्धिबळ खेळाची उपजत आवड आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. लक्ष्यजितने आपल्या यशाचे श्रेय बुद्धिबळ प्रशिक्षक तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि आपल्या आई-वडिलांना दिले आहे.