Home यवतमाळ पोहरादेवी येथे आज संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवरा ज्यातील समाज बांधवांनी...

पोहरादेवी येथे आज संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवरा ज्यातील समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे – ना. संजय राठोड यांचे आवाहन

260
यवतमाळ : बंजारा काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी ( जि. वाशीम) संत नगरीत श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव उद्या १४ फेब्रुवारी रोजी शनिवारी पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य, बनजारा विरासत संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गोर बंजारा समाजबांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री लोकनेते ना. संजय राठोड यांनी केले आहे.
जय सेवालाल बोलो, पोहरागड चालो, असा नारा ना. संजय राठोड यांनी दिला आहे. यावेळी बंजारा काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवीत श्री संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव उदघाटन व सेवा रत्न पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते लाखो सेवा भक्तांच्या साक्षीने पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार, मृदू व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे उपस्थित राहणार आहेत. शुभआशीर्वाद देण्यासाठी धर्मगुरु महंत तथा आमदार श्री. बाबुसिंग महाराज, धर्मगुरू महंत श्री. कबीरदास महाराज यांची उपस्थिती राहील. त्याच बरोबर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख, विधान परिषद सदस्य श्रीमती भावनाताई गवळी, विधान परिषद सदस्य राजेश राठोड, विधानसभा सदस्य तुषार राठोड, विधानसभा सदस्य श्रीमती सईताई प्रकाश डहाके, पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य धीरज लिंगाडे, शिक्षक मतदार संघाचे विधान परिषद सदस्य किरण सरनाईक, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार निलय नाईक , वाशीम जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, वाशीम मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थितीमध्ये महंत जितेंद्र महाराज, महंत सुनील महाराज, महंत यशवंत महाराज, महंत शेखर महाराज, महंत गोपाल महाराज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी १ वाजता पोहरादेवीच्या संतनगरीत आगमन होणार असुन आदिमाया शक्ती देवी जगदंबा, जगतगुरु संत सेवालाल महाराज आणि महान तपस्वी संत डॉ. रामराव बापू यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव साजरा करण्यासाठी मान्यवरासह हजेरी लावणार आहेत.
उद्या शनिवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १ वाजतापर्यंत संत सेवालाल महाराज प्रांगणात सेवा प्रसाद
वाटप, दुपारी ४.३० ते ६ अल्पोपहार, रात्री ९ वाजता सेवा प्रसाद वाटप तसेच भजन कीर्तन कार्यक्रम, यावेळी सकाळच्या सुमारास ”जातेन हातेम लेन चालो सेवालाल तू ” या बंजारा गीतासह विविध गीते गायन करून घराघरात पोहचलेल्या गायिका मंगली यांचा गाण्यांचा बहारदार कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजता “टकटक देखरो सावरिया” बंजारा गीतासह गुलाबी साडी गाणी गाणारा तरुण गायक संजू राठोड यांच्या गाण्याचा बहारदार कार्यक्रमासह लेझर शो, ड्रॉइंग शो आणि फायर शो साजरा होणार आहे. या सोहळ्याला राज्यभरातील गोर बंजारा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य, बनजारा विरासत संघ व निमंत्रक राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.