Home यवतमाळ लालगुडा–ज्योतिबार गल्लीतील मटका अड्ड्यांना एसडीपीओंची मूकसंमती??

लालगुडा–ज्योतिबार गल्लीतील मटका अड्ड्यांना एसडीपीओंची मूकसंमती??

378

निवडक धाडसत्रमुळे वणी एसडीपीओच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह..!

वणी ( प्रतिनिधी ) – वणी शहरात मटका जुगारा विरोधात कारवाई सुरू असल्याचे चित्र पोलिसांकडून रंगवले जात असले, तरी प्रत्यक्षात काही मटका अड्ड्यांना अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोप आता उघडपणे चर्चेत आला आहे. लालगुडा व ज्योतिबारच्या गल्लीतील मटका अड्डे आजही राजरोसपणे सुरू असून त्यामागे थेट एसडीपीओंची मूकसंमती आहे काय? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
वणी शहरातील मटका अड्ड्यांवर एसडीपीओंच्या नेतृत्वाखाली धाडसत्र सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ३१ जानेवारी रोजी भाजी मंडीतील मटका अड्ड्यावर धाड टाकण्यात आली, मात्र याच वेळी एका सुज्ञ नागरिकाने पोलिस पथकाला ज्योतिबारच्या गल्लीमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्याची माहिती दिली.
धक्कादायक बाब म्हणजे, त्या पथकातील मारेगाव येथील एका पीएसआयने “तेथे धाड टाकण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही” असे सांगून नागरिकांना अक्षरशः टाळले. हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा आहे की जाणीवपूर्वक केलेली दुर्लक्षाची कृती? असा सवाल उपस्थित होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, एसडीपीओ वणी यांनी मारेगाव येथील एका पीएसआयची तसेच एलसीबी पथकाची धाडसत्रासाठी नियुक्ती केली आहे, तरीही लालगुडा व ज्योतिबार परिसरातील मटका अड्ड्यांवर एकही कारवाई न होणे संशयाला अधिक बळ देते.
➡️ निवडक ठिकाणीच धाडी, निवडक अड्ड्यांनाच अभय — हा कुठला कायदा?
➡️ एसडीपीओंच्या आदेशानेच काही मटका अड्डे वाचवले जात आहेत काय?
➡️ सामान्य नागरिकांनी दिलेली माहिती झुगारली जात असेल तर पोलिस यंत्रणा कुणासाठी काम करते?
आज वणी शहरात अशी चर्चा जोर धरू लागली आहे की, एसडीपीओंच्या मूकसंमतीशिवाय लालगुडा व ज्योतिबारच्या गल्लीतील मटका अड्डे सुरू राहूच शकत नाहीत. जर हे आरोप खोटे असतील, तर एसडीपीओंनी तात्काळ खुलासा करून संबंधित भागात धाड टाकून कारवाई करावी, अन्यथा या ‘मूकसंमती’चा अर्थ जनतेला वेगळाच काढावा लागेल.
🔴 प्रशासनाने याची दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा वणीतील कायदा-सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास पूर्णपणे उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.