Home वाशिम खेळतांना विहिरीत पडलेल्या मुलीचा मृतदेह संत गाडगे बाबा आपात्कालीन बचाव पथकाने शोधुन...

खेळतांना विहिरीत पडलेल्या मुलीचा मृतदेह संत गाडगे बाबा आपात्कालीन बचाव पथकाने शोधुन बाहेर काढला

523

 

फुलचंद भगत
वाशिम:-मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा मंगरूळपीरच्या टिमचे साहसी कार्य करत एका विहिरीत पडलेल्या मुलीचा मृतदेह शोधुन काढला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी अंदाजे 11:00 वाजताचे दरम्यान मंगरूळपीर जि.वाशिम येथील मंगरूळपीर ते वाशीम रोडवर विद्युत केंद्रानजिक असलेल्या विट भट्टीवर काम करणा-या मजुराची मुलगी खेळता खेळता येथीलच वीटभट्टी नजिक असलेल्या विहिरीत पडल्याची माहीती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना दीली लगेच मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार कीशोर शेळके यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवन-रक्षक दिपक सदाफळे यांना माहिती देऊन पाचारण केले लगेच दिपक सदाफळे यांनी तात्काळ आपले सहकारी गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल,अपूर्व चेके, लखन खोडे,शुभम भोपळे,शिवा अडात,सिद्ध इंगोले यांना घटनास्थळी रवाना केले आणी एका तासातच विहरीतील मृतदेह शोधून बाहेर काढून पोलीसांचे ताब्यात दिला मृतक मुलगी ही कु.सुंदरी धनसिंग सीसोदिया झीर पांजरीया ता.नेपानगर जि. बु-हाणपुर अं.व.3 वर्ष येथील असल्याचे समजले. यावेळी घटनास्थळावर उपस्थित पोलीस अधिकारीसह पोलीस कर्मचारी तसेच आणी विटभट्टीवरील कामगार व नातेवाईक हजर होते.यावेळी स्थानिकांनी बचाव पथकाच्या साहसाचे आणी तत्परतेचे कौतुक केले आहे.