Home यवतमाळ कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणी हिच देशसेवा – ॲड निखिल सायरे यांचे प्रतिपादन

कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणी हिच देशसेवा – ॲड निखिल सायरे यांचे प्रतिपादन

204
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबीराला केले मार्गदर्शन
“कायद्याचे स्वरुप हे दिवसेंदिवस बदलत असुन काळात ओघात आपल्याला बदलत्या कायद्याची माहिती करवुन घेऊन त्यानुसार त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे, याकरीता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष जागरुक असले पाहिजे. कायदे हे जनकल्याणासाठी असुन त्याची काटेकोर अंमलबजावणी हिच देशसेवा आहे “, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲड निखिल सायरे यांनी केले. ते बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबीराला मार्गदर्शन करीत होते.
तालुक्यातील दत्तक ग्राम घोडखिंडी येथे बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबीराचे दिनांक ३० जानेवारी पासून आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ॲड निखिल सायरे यांचे ‘कायद्याचे बदलते स्वरुप’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ॲड सायरे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. संजय त्रिपाठी यांनी देखील समायोजित मार्गदर्शन करीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक दुर्लक्षित घटकाला मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रा. संजय त्रिपाठी, ॲड रंजित अगमे, प्रा. गजानन लांजेवार, प्रा. दत्तात्रय जोशी,‌ कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना उपस्थित होते.