Home अमरावती कौंडण्यपूर येथून पिस्टल, तलवारी, रॉड जप्त…!

कौंडण्यपूर येथून पिस्टल, तलवारी, रॉड जप्त…!

439

सात आरोपींना अटक : कुऱ्हा पोलिसांची कारवाई,

प्रतिनिधी, ऐजाझ खान अमरावती…

अमरावती :- अमरावती जिल्यात येणाऱ्या कौन्डण्यपूर येतव गुन्हा करण्याच्या उद्देशाने एका शिवारात दडलेल्या सात आरोपींना कुऱ्हा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्टल, दोन जिवंत काडतूस, दोन तलवारी, लोखंडी रॉड, काठी, दोन दांडके, चारचाकी व दुचाकी असा एकूण २ लाख ८६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुधवारी (दि. ११) मध्यरात्रीनंतर कौंडण्यपूर येथील अंजनसिंगी टी पॉइंट लगतच्या एका शेतात ही कारवाई करण्यात आली.
आरोपींमध्ये शेख शानू शेख जब्बार (३५, रा. इतवारा बाजार, वर्धा), अनिल परियाल (४२, रा. महादेवपुरा, वर्धा), शेख शाहरूख शेख रऊफ (३०, रा. आर्वी), मो. जाफर मो. यासीन (३०, रा. आर्वी), आदित्या डाकोडे (२०, रा. देऊरवाडा, वर्धा), शेख साबीर शेख कदीर (३५, रा. आर्वी) व प्रतीक बाबाराव ठाकरे (३२, रा. रेल्वे स्टेशन, वर्धा) यांचा समावेश आहे. बुधवारी रात्री कुऱ्हा पोलिसांनी त्या शेतात धाड टाकली. पोलिसांनी सातही आरोपींना पकडून चौकशी केली. तेथे दोन तलवारी मिळून आल्या.
पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कुन्ह्याचे ठाणेदार अनुप वाकडे, पीएसआय विलास थुल, अंमलदार सोमेश्वर सपाटे, योगेंद्र लाड, अनिल निघोट, उमेश वाघमारे, ज्ञानेश्वर देवतळे, सागर निमकर आदींनी केली.

बॉक्स
कारच्या डिक्कीत होती पिस्टल

खोलीसमोरील कारच्या डिक्कीत एका कापडी पिशवीत देशी बनावटीचे पिस्टल, मॅक्झिन, दोन जिवंत काडतूस आढळले. दुचाकीच्या साइड गार्डला लोखंडी रॉड, काठी व दोन लाकडी दांडकेही आढळून आलेत.