Home बुलडाणा विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन दे.माळीत संतश्रेष्ठ गोरोबा काका पुण्यतिथी साजरी .

विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन दे.माळीत संतश्रेष्ठ गोरोबा काका पुण्यतिथी साजरी .

255

तरुणाई फाउंडेशनचा उपक्रम; महापुरुषांची प्रेरणा देण्याचा उद्देश

देऊळगाव माळी प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील संत परंपरा व महापुरुषांच्या जीवनकार्याची माहिती व्हावी व त्यांना प्रेरणा मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम संत परंपरेतील ज्येष्ठ संत श्री .विठ्ठलाचे निस्सिम भक्त संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त 26 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ शाखा देऊळगाव माळी वतीने राबवण्यात आला.
शालेय जीवनात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची थोर संत परंपरा व महापुरुष यांची ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम गेल्या १३ वर्षांपासून तरुणाई फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी गोरोबा हा पुण्यतिथीच्या दिनी राबविला जात आहे. यावर्षीही संत व महापुरुष यांचे जीवनकार्य व त्यांचा परिचय आदी विविध पुस्तके कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत भेट देण्यात आले.
यावेळी संत शिरोमणी गोरोबाकाका यांना अभिवादन करण्यासाठी
किसान सेना (उबाठा) नेते नारायण बळी, जेष्ठ पत्रकार महेंद्र बोर्डे, क्रांतीसुर्य तालीम संघ अध्यक्ष किसनराव बळी, माजी उपसरपंच विनोद फलके,आश्रुजी मगर ,गजानन बळी (फौजी) शिक्षक ज्ञानेश्वर गायकवाड , फकिरा राजगुरू,दत्ता बनसोडे,जयराम बकाल,सुखदेव पोकळे,अशोक गायकवाड,मदन बनसोडे,भागवत भराड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती घेण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप केल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा पुण्यतिथी सोहळा यशस्वी करण्यासाठी.
ज्येष्ठ मूर्तिकार हरिभाऊ राऊत, निंबाजी राऊत, समाधान लिंगायत कर, बबन जामकर, गजानन शांताराम राऊत, तरूणाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास राऊत,दत्ता राऊत, संजय राऊत, पांडुरंग राऊत, सोनाजी राऊत, ज्ञानेश्वर राऊत ,दिपक राऊत,श्रीराम राऊत, गजानन निं. राऊत, दत्ता काळे ,केशव राऊत, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इत्यादींनी परिश्रम घेतले.