Home यवतमाळ सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी यवतमाळकरांचा पुढाकार; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर”

सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी यवतमाळकरांचा पुढाकार; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर”

310

यवतमाळ,दि.२८ एप्रिल. – देशात अलीकडे घडलेल्या पहेलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर द्वेषभावना पसरवण्याचे प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर,यवतमाळ शहरातील विविध सामाजिक संघटनांनी आज दिनांक 28 एप्रिल (सोमवार) रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता यांना निवेदन दिले.
सदर निवेदनाद्वारे,सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या भडकाऊ व समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांविरोधात त्वरीत कार्यवाही करावी,अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की,पहेलगाम हल्ल्याचा निषेध करत असताना संपूर्ण मुस्लिम समाजाला जबाबदार ठरवण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे.यामुळे समाजात तणाव व फूट निर्माण होण्याचा धोका आहे. यवतमाळसारख्या सामाजिक सलोख्याची समृद्ध परंपरा असलेल्या शहरात शांतता आणि एकोपा टिकवण्यासाठी प्रशासनाने सजग राहावे व आवश्यक ती कारवाई करावी,अशी भूमिका नागरिकांनी मांडली.

निवेदन देताना उपस्थित असलेल्या प्रमुख संघटना व प्रतिनिधी:
– महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, यवतमाळ
– युवा जागर ट्रस्ट,यवतमाळ
– नारी रक्षा समिती,यवतमाळ
– धैर्य सोशल वेल्फेअर फाउंडेशन
– मराठा सेवा संघ
– कॉम्रेड सचिन मनवर मित्र परिवार

उपस्थित प्रतिनिधी:
ज्ञानेश्वर गायकवाड,दीपक पिसाळकर, प्रतिक तराळकर,ऍड.धनंजय लोखंडे,ऍड.जयसिंग चव्हाण,प्रा. घनश्याम दरणे,ऍड.सीमा तेलंगे,विनोद दोंदल,अतिक शेख,किशोर बाभुळकर,शशिकांत खडसे,कॉम्रेड सचिन मनवर,राहुल दाभाडकर,रमीज शेख,कमलेश बघेल, स्नेहल रेचे,तेजस चव्हाण,प्रा.पंढरी पाठे आदी.

निवेदनाद्वारे प्रशासनाला विनंती करण्यात आली की,सामाजिक माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या प्रक्षोभक संदेशांची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी.तसेच,नागरिकांना शांतता व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करावे.

कोट —-
“समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कायद्याचा कठोर इशारा देणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून यवतमाळचा सामाजिक सलोखा टिकून राहील.”
— ऍड.सीमा तेलंगे (सोशल ऍक्टिव्हिस्ट)

“यवतमाळ जिल्ह्यातील शांतता आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.सामाजिक माध्यमांवरून द्वेष पसरवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संदेशांवर लक्ष ठेवले जात आहे आणि अशा प्रकारांवर कठोर कार्यवाही केली जाईल.”
— कुमार चिंता,(जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ