Home यवतमाळ हॉटेल गॅन्सन येथे चालू असलेल्या आयपीएल बेटिंग प्रकरणाचा पर्दाफाश: स्थानिक गुन्हे शाखा,...

हॉटेल गॅन्सन येथे चालू असलेल्या आयपीएल बेटिंग प्रकरणाचा पर्दाफाश: स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची मोठी कारवाई

500

यवतमाळ, दि. २५ एप्रिल २०२५:
स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी मोठी कारवाई करत हॉटेल गॅन्सन येथे चालू असलेला आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावण्याचा अवैध प्रकार उघडकीस आणला आहे. पोलिस अधीक्षक श्री. कुमार सिंह यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही धाडसत्र राबवले.

यामध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेल गॅन्सनच्या रूम नंबर २१९ मध्ये छापा टाकला. छाप्यात आरोपी श्रीकांत रमेश घोडके (रा. घाटंजी) व रोहित संतोष कुळमेथे (रा. नांदगाव पेठ, यवतमाळ) हे दोघे सट्टा खेळताना आढळले.

पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला:

सट्टा लावण्यासाठी वापरण्यात आलेले रोख रक्कम: ₹४०,०००/-

दोन मोबाईल फोन: ₹२५,०००/-

एक लॅपटॉप: ₹३०,०००/-

ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या कागदपत्रे/रजिस्टर पेपर्स
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: ₹१,२५,०००/-

या प्रकरणात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. संदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राठोड, पोहेका/रितुराज बेंडवे, पोशि/आकाश सहारे यांनी पार पाडली.