Home यवतमाळ सुख सुविधा द्या अन्यथा प्लॉट विक्री बंद करा.. मनसेची मागणी

सुख सुविधा द्या अन्यथा प्लॉट विक्री बंद करा.. मनसेची मागणी

239

ढाणकी प्रतिनिधी
ढाणकी शहरातील अनधिकृत लेआउट चा सुळसुळाट झाला असून दाणकी शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत लेआउट आहेत. ढाणकी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात होणाऱ्या तालुक्याचे संकेत पाहन बिल्डर लॉबी या संधीचे सोने करून घेताना दिसत आहे. ढाणकी नगरीत दररोज एका नवीन लेआउट चा उदय होताना दिसतो. शासनाच्या नियमांना बगल देऊन लेआउट मध्ये कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध न करता सर्रास प्लॉट विक्री सुरू आहे. परिणामी या सर्वांचा भार नगरपंचायत वर पडत असून सर्वसामान्य नागरिक नगरपंचायत कडे नळ, नाल्या,रस्ते, लाईन, त्यासाठी अर्ज करताना दिसत आहे. बिल्डर लॉबी आपल्या फाय‌द्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसून प्रशासनाला चुना लावत, आपल्या संधीचे सोने करत आहे. हे सर्व होत असताना कोणत्याच विभागामार्फत या अनधिकृत लेआउट धारकांवर कार्यवाही होताना दिसत नाही परिणामी प्लॉट धारकाचे आर्थिक फसवणूक होत आहे. हा सर्व प्रकार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्या प्रकरणी तसेच सर्व नियम डावलून संबंधित लेआउट धारकांना परवानगी दिल्याप्रकरणी या सर्व प्रकरणाची चौकशी करून ढाणकी शहरात चालू असलेल्या सर्व प्लॉटिंगची चौकशी व्हावी तसेच कुठली शहानिशा न करता परवानगी देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाईची करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली . सर्व प्लॉट धारकांना तात्काळ जोपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत सर्व ढाणकी शहरातील प्लॉट विक्री बंद करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ढाणकी नगरपंचायत समोर सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल.
निवेदन देते वेळी मनसे जिल्हाअध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, तालुका अध्यक्ष सादिक शेख, सिद्धार्थ घुगरे, हिरासिहं चव्हाण, मुकुंद जोशी,यासाह इतरही मनसे सैनिक उपस्थित होते