Home महत्वाची बातमी ऑक्सिजन सिलेंडर चा स्फोट होऊन एक ठार दोन गंभीर जखमी ,

ऑक्सिजन सिलेंडर चा स्फोट होऊन एक ठार दोन गंभीर जखमी ,

110

 

 

मलकापूर जिला बुलडाणा ,

ऑक्सीजन सिलेंडरच्या स्फोटामुळे आज 23 मार्च रोजी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मीनगर येथे ही घटना घडली.

ऑटोमध्ये ऑक्सीजन सिलेंडर टाकत असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात एक जण ठार झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑटोमध्ये सिलेंडर ठेवत असताना गॅस गळतीमुळे किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.