Home महत्वाची बातमी अवेध दारू विक्रेत्याने पोलिसाला मारून टाकले ,

अवेध दारू विक्रेत्याने पोलिसाला मारून टाकले ,

784

 

अमीन शाह

बुलडाणा ,

बुलडाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांची हिंमत चांगलीच वाढली आहे. एका दारू विक्रेत्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकी वाहनाला लाथ मारल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला याची घटना आज, २३ मार्चला दुपारी दोनच्या सुमारास चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ जवळ घडली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी देखील झाला आहे. दोन्ही पोलीस कर्मचारी अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. भागवत गिरी असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून राम आंधळे जखमी झाले आहेत..
पोलिसांच्या हफ्ते वसुली मुळे अवेध धंदे करणाऱ्याचे होसले बुलंद झाल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे ,

प्राप्त माहितीनुसार अंढेरा पोलीस स्टेशनचे राम आंधळे आणि भागवत गिरी दुचाकीने शेळगाव आटोळ परिसरात पेट्रोलिंग करत होते. शिवणकर नामक अवैध दारू विक्रेता दारूचे बॉक्स घेऊन शेळगाव आटोळकडे येत होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शिवणकरला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मिसाळवाडी ते शेळगाव आटोळच्या मध्ये शिवणकरने पोलिसांचा दुचाकीला लाथ मारली, त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. यात दुचाकी चालवणारे भागवत गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी राम आंधळे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याची माहिती मिळाली आहे ,