Home बुलडाणा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना धीर; सरकारने मागणी तात्काळ मान्य करावी – हुसेन खान

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना धीर; सरकारने मागणी तात्काळ मान्य करावी – हुसेन खान

344

देवळगाव राजा: प्रगतिशील शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी शेतकरी विकास मंच, महाराष्ट्र आणि जमाअत इस्लामी हिंद यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी सरकारने नागरे यांच्या सिंचन पाण्यासंदर्भातील मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

शेतकरी विकास मंचचे अध्यक्ष हुसेन खान यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात लियाकत खान चिखली, अमान इनामदार हिवरखेड यांचा समावेश होता. तसेच जमाअत इस्लामी हिंदचे प्रतिनिधी शेख मुजीब (सचिव) सामाजिक राष्ट्रीय मुबंई, सय्यद शाकीर जालना, मुशीर कोटकर देवळगाव राजा आणि शेख लुकमान सर देवळगाव राजा हेही उपस्थित होते.

या भेटीदरम्यान, सरकार सिंचनासाठी शेतकऱ्यांची जमीन घेते, मात्र त्यांना सिंचनाच्या पाण्यासाठी लढा द्यावा लागतो, ही मोठी शोकांतिका असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.