Home महत्वाची बातमी जवायाचा राग अनावर झालं अन, विपरितच घडलं ?

जवायाचा राग अनावर झालं अन, विपरितच घडलं ?

609

पत्नीला माझ्या सोबत का पाठवत नाही जवायाचा सासुवर चाकू हल्ला ,

जवायास अटक ,

 

अमीन शाह ,

संग्रामपूर , बुलडाणा ,

माझ्या सोबत माझी बायको का पाठवत नाही म्हणून एका दारुड्या जवायाने आपल्या सासुवर चाकूने स्पा सप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील पातूरडा या गावी घडली ,

या संदर्भात पोलीस विभागा कडून मिळालेल्या माहिती नुसार शिरीकृष्ण आढाव रा , माळेगाव बाजार याचा विवाह येथील भागता बाई यांच्या मुली सोबत झाला होता मात्र शिरीकृष्ण हा दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करायचा त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती माहेरात येऊन राहत होती दि , 12 रोजी शिरीकृष्ण हा सासूच्या घरी आला व माझी पत्नी नंदवायला का पाठवत नाही म्हणून सासू भागता बाई सोबत भांडन करू लागला पाहता पाहता त्याने खिशातून चाकू काढला व सासुवर वार करू लागला आरडा ओरड चा आवाज आल्याने शेजारी धावून आले व आरोपी पळून गेला होता या प्रकरणी तामगाव पोलिसात राजु जगदेव यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे आज आरोपीला न्यायालया समोर उभे केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे या घटनेचा पुढील तपास दुययम ठाणेदार जीवन सोनुने हे करीत आहे ,