Home यवतमाळ सहकारी बँकेचा सावकारी उद्रेक , “कर्मचाऱ्यांना फसवणूक, ग्राहकांवर अन्याय”

सहकारी बँकेचा सावकारी उद्रेक , “कर्मचाऱ्यांना फसवणूक, ग्राहकांवर अन्याय”

563

बँकेच्या नावावर सावकारी व्यवसाय , एआर व डी डी आर यांनी विशेष लक्ष देण्याची गरज…!

16 ते 24 टक्के व्याजदर कोणाच्या घशात , मग शासन अंमलबजावणीचे काय??

यवतमाळ – काही वर्षांतच नावारूपास आलेल्या बँक आता सावकारी जाळ्यात अडकले आहे. बँकेचा मुख्य सूत्रधार स्वतः मोठ्या प्रमाणात सावकारी करीत असून, घर, प्लॉट, आणि इतर मालमत्ता गहाण ठेवून कर्ज देण्याचे धंदे बिनधास्त सुरू आहेत. या कामासाठी विविध एजंट तयार करण्यात आले असून, हे एजंट ग्राहकांना हव्या त्या दरात कर्ज देत आहेत आणि आपली आणि आपल्या बँकेची माया वाढवत आहेत.

कर्मचाऱ्यांवर आर्थिक अन्याय, एफडीचा सक्तीचा भार..!

*** बँकेचे प्रेम फक्त ‘एफडी’वर दिसून येत आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळत नसून, त्यांच्यावर जबरदस्ती एफडी करण्याचा दबाव टाकला जात आहे. नोकरी मिळवण्यासाठी लाखोंची एफडी घेण्यास भाग पाडले जात आहे. कागदोपत्री पगार वेगळा असला तरी प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना हातात हवा तितका पगार मिळत नाही. उर्वरित रक्कम नक्की कुठे जाते, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ड्रेस कोडच्या नावावर लाखोंचा घोटाळा

कर्मचाऱ्यांना विशिष्ट ड्रेस कोड बंधनकारक करून त्याच्या नावावर लाखोंचे बिल उचलण्यात आले आहे. बँकेच्या फंडातून हे पैसे खर्च केले जात असल्याचे समजते. वास्तविक पाहता, कर्मचाऱ्यांना या खर्चाचा कोणताही फायदा होत नसल्याची चर्चा आहे.

यवतमाळमध्ये बँक बुडण्याच्या मार्गावर?

जन संघर्ष घोटाळा गाजत असतानाच, यवतमाळ जिल्ह्यात *** बँक बुडण्याच्या मार्गावर असल्याचे विश्वासू सूत्रांकडून समजते. बँकेच्या उच्च पदस्थ अधिकारीवर्गाने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, आलिशान गाड्या आणि भव्य घरे उभारल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये कोट्यवधींची अफरातफर झाल्याचा संशय आहे.

बँकेतील आर्थिक गैरव्यवहार आणि पोलिसांची तपासणी

शाखेतील ‘क्लोजिंग अमाऊंट’ आणि कागदपत्रे तपासली असता अनेक आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. बँकेतील या गैरप्रकारांविरोधात लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी सावध राहण्याची गरज

बँकेत एफडी करणाऱ्या ग्राहकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.