Home यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात बनावट दारूचा हैदोस….

यवतमाळ जिल्ह्यात बनावट दारूचा हैदोस….

549

राज्य उत्पादक शुल्क विभागाने लक्ष देण्याची गरज

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यात लगत असलेल्या पाटणबोरी चेक पोस्ट वरून आंध्रातील डुबलीकेट दारू यवतमाळ शहरासह जिल्ह्यात येत असून सदर ही दारू पिल्यानंतर सकाळी उठल्यानंतर अनेकांना डोक्यात भणभण वाटते तर शहरातील काही वाईन शॉप मध्ये तो ब्रँड मिळतच नाही तर इतर काही दुकानात तो ब्रँड उपलब्ध असतो. त्याचप्रमाणे यवतमाळ शहरातील विविध भागात व्हिस्की रम प्रमाणे देशी हातभट्टी मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे.
यामध्ये शहरातील पिंपळगाव , लोहारा , वाघापूर , तलाव फैल , गवळी पुरा व मोहा फाटा येथे सर्रास हातभट्टी काढून मोठा प्रमाणात विकल्या जात आहे. या हातभट्टी मिश्रणामध्ये अधिक नशा चढण्याकरिता मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे कीटकनाशक टाकल्या जातात त्यामुळे दर महिन्याला साधारण दारू पिल्यामुळे चार ते पाच लोकांचा मृत्यू होतो परंतु अशा बनावट कीटकनाशक टाकल्या जाणाऱ्या दारू पिऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीची नोंद केल्या जात नाही. सदर मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या फुफसामध्ये पॉझन होते त्या पॉझनमुळे मृत्यू होतो . सदर दारुमुळे मृत्यू पावलेल्या परिवारातील व्यक्ती पोलीस स्टेशनला तक्रार देत नाही.
यवतमाळ शासकीय रुग्णालयात दारू पिऊन मृत्यू पावलेल्या कित्येक लोकांची नोंद आहे. म्हणूनच यवतमाळ राज्य उत्पादक शुल्क व पोलिसांनी अशा देशी हातभट्टींचा व बनावट दारूंचा पडदाफाश करावा .
अशी मागणी सध्या यवतमाळ शहरासह जिल्ह्यात जोर करत आहे.