Home बुलडाणा मुंबई मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

259

 

 

मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे युवकाचे वाचले प्राण..

अमीन शाह

बुलढाणा जिल्ह्यातील बहुचर्चित बनावट नोटा प्रकरणी यशवंत सेनेचे जिल्हा संघटक गजानन बोरकर यांनी मुंबई येथे मंत्रालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला प्रसंगी मुंबई पोलीस वेळीच धावल्यामुळे मोठा अनर्थळून गजानन बोरकर यांचा जीव वाचवण्यात मुंबई पोलिसांनी मोलाचे योगदान दिले आहे.
आपल्या कर्तव्यप्रती इमान बाळगून पोलिसांनी कारवाई केल्यास कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीस टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येत नाही. मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेला बनावट नोटा प्रकरणाचा नाट्यमय घडामोडीचा पडदा अजून उठत नाही. मागील दोन महिन्यांपासून पोलीस दरबारी तक्रारी करून जेरीस आलेल्या गजानन बोरकर यांनी 20 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान मुंबई मंत्रालया समक्ष अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला परंतु घटनास्थळावर उपस्थित असलेल्या पोलिसांकडून त्यांच्या हातामधली माचिस हिसकावल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे त्याचप्रमाणे त्यांचा जीव वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी केलेल्या चौकशीमध्ये आणि ठाणेदार घुगे यांनी केलेल्या कारवाईच्या तपास दरम्यान मोठी तफावत आढळून आली आहे. याप्रकरणी ठाणेदार घुगे यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे यांनी आठवडा उलटून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. या संदर्भात आंदोलनकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना स्मरणपत्र सुद्धा दिले होते. भ्रमणध्वनी वरून जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत बोरकर यांची चर्चा सुद्धा झाली होती.चुकीला क्षमा नाही अशा प्रकारचे अभिवचन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बोरकर यांना दिले होते. आंदोलन कर्त्याच्या सांगण्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दिलेल्या शब्दावरून त्यांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. परंतु वरिष्ठ अधिकारी सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही असे दिसून आल्याने झालेला गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी बोरकर यांच्याकडे कोणताही मार्ग उरला नव्हता त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल घेत मंत्रालया समक्ष अंगावर डिझेल ओतून स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वसामान्य व्यक्तीच्या कायदा सुव्यवस्था संदर्भात उभारलेल्या या लढ्याला पोलीस विभागाकडूनच पाठ फिरवली जाते. अर्थातच पोलीस अधिकारी यामध्ये संशयाच्या भूमिकेत असल्यामुळे आपल्या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. परंतु बनावट नोटा प्रकरण अथवा नोटांचा पाऊस रॅकेट या संदर्भात गंभीर घटना गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारच्या आरोपीत व्यक्तींना वाचण्यासाठी पोलीस दल आपली सर्व शक्ती खर्च करीत आहे ही बाब चिंताजनक आहे.
मुंबई येथे मंत्रालया समक्ष जीवावर उधार होऊन केलेल्या आंदोलनाला यश मिळणार अथवा अद्यापही जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे पाठ फिरून बसणार या संदर्भात आगामी काळात निश्चित कळेल. परंतु नाईक लढाई लढत असताना आपला जीव दावणीवर ठेवत आंदोलन केल्यामुळे गजानन बोरकर यांना नरिमन पॉईंट पोलीस चौकीमध्ये चौकशी करण्यासाठी नेण्यात आले होते. वृत्त लिखेपर्यंत त्यांची सुटका झाली नसून कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल झाला हे सुद्धा कळले नव्हते.