Home यवतमाळ प्रमोद बगाडे यांची यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड – नव्या नेतृत्वाला...

प्रमोद बगाडे यांची यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड – नव्या नेतृत्वाला नवसंजीवनी!

169

यवतमाळ,18 फेब्रुवारी: – युवकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक असलेल्या भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी प्रमोद बगाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

दिनांक 17 फेब्रुवारी,हॉटेल एकविरा,यवतमाळ येथे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युवा पंचायत आयोजित करण्यात आली होती. या वेळी मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले.त्याच कार्यक्रमात यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या ऐतिहासिक क्षणी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकनेते बाळासाहेब मांगुळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तातूभाऊ देशमुख, अखिल भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे सचिव कुमार रोहित, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव अजित सिंग,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव शैख तालिब अहमद,तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव आयुषी देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
युवकांमध्ये उत्साह,पक्षसंघटनेला बळ!
या नियुक्तीमुळे युवकांच्या प्रगतीसाठी नवे पर्व सुरू होणार असून काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष,यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
नेतृत्व बदलले,उमेद वाढली!
या निर्णयामुळे यवतमाळ जिल्ह्यातील युवकांमध्ये नवचैतन्य संचारले असून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे प्रमोद बगाडे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत होईल आणि युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल,असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा प्रमोद बगाडे यांच्यावर सोपविल्याबद्दल बगाडे यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे,यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्र मोघे,महाराष्ट्र युवक काँग्रेसचे महासचिव श्रीनिवास नालमवार यांचे आभार मानले.

कोट —-
“प्रमोद बगाडे यांच्या रूपाने यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसला एक नवीन, प्रभावी आणि सक्षम नेतृत्व मिळाले आहे. त्यांनी आजवर केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.उद्याच्या काळात ते सर्वांना सोबत घेऊन पुढे जातील आणि युवकांच्या विकासासाठी नवे मापदंड निर्माण करतील, असा मला ठाम विश्वास आहे!”
— कुमार रोहित(सचिव,अखिल भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस)

“यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल राष्ट्रीय कार्यकारिणीचे मनःपूर्वक आभार! हा केवळ सन्मान नसून,जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव आहे.युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने कार्यरत राहीन. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही!”
—- प्रमोद बगाडे (जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस,यवतमाळ जिल्हा)