
जालना/लक्ष्मण बिलोरे
मैत्रेय फसवणूक प्रकरण हा एक स्वतंत्र विषय आहे.समाजातील गोरगरिब गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक मैत्रेय उद्योग समुहाने केलेली आहे.या फसवणूक प्रकरणाला ,या प्रकरणाचा निपटारा होण्यास किती दिवस लागतील हे निश्चित नाही. परतावे मिळण्यास कधी सुरूवात होईल हे कोणीही सांगू शकत नाही.ज्या संस्था, संघटनांनी परतावे मिळवून देण्याच्या नावाखाली दुकानदारी सुरू केली ,पिडित गुंतवणूकदारांकडून परतावे मिळवून देवू असे सांगून लाखों रूपये लुटले गेले काहिच्या दुकाना बंद पडल्या असून हे लुटारूही गायब झालेले आहेत. मैत्रेय उद्योग समुह बंद पडून ८वर्षे होवून गेली आहेत .या फसवणूक प्रकरणी शासन ,प्रशासन उदासिन असल्याचे दिसून येत आहे.मैत्रेय फसवणूक प्रकरणी मुंबई कोर्टात केस सुरू आहे…आणि आरोपींना ,गुन्हेगारांना हेच हवं असतं.म्हणून जाणीवपूर्वक check बाउंन्स करणे ,परतावे न देणे,शाखा बंद पाडणे हे प्लॅनिंग नुसार हे लोक करत असतात जेणे करून गुन्हा दाखल झाला पाहिजे. एकदा गुन्हा दाखल झाला,प्रकरण कोर्टात गेले कि ,वर्षानुवर्षे केस चालत राहते.लोकांचा ससेमिराही मागे राहत नाही. ‘तुमचे परतावे परत केले असते पण काय करणार कोर्टाचे आदेश मिळाल्याशिवाय काही करता येत नाही ‘ केस ,खटला किती दिवस चालेल.हे निश्चित नसतं.मैत्रेय फसवणूक प्रकरण गुंतागुंतीचं बनवलं गेलं आहे.मैत्रेय मॅनेजमेंटने नियोजनबद्धरित्या गुंतवणूकदारांच्या पैशातून जमवलेली प्रचंड मालमत्ता विखरून टाकलेली आहे.सेबीने दंडांच्या स्वरूपात प्राप्त मालमत्तेवर टाच ठेवून गिळंकृत केलेली आहे. काही मालमत्तेवर आरोपींनी आक्षेप घेतलेला आहे .विशेष म्हणजे कोट्यावधीच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी वर्षा सत्पाळकर आठ वर्षांपासून फरार आहे. राज्यातील अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असूनही आरोपी मोकाट आहेत तर काही आरोपींची जामिनवर सुटका झालेली आहे. शासन,प्रशासन असो कि कोर्ट मैत्रेय प्रकरणी अद्याप ठोस असे काहीच नाही. फक्त वर्षानुवर्षे तारिख पे तारिख सुरू आहे. कामगार संघटना एकमेव आहे ज्या संघटनेच्या महिला कोर्टात तारखेला हजेरी लावून पुढची तारिख घेवून येतात.संघटनेच्या वकिलाच्या शिफारशीनुसार एका संस्थेने वकिल मिळवून कोट्यावधी रूपयांची फसवणूक प्रकरणाची केस अडखळत अडखळत सुरू आहे. मैत्रेय प्रकरणी आंदोलन, मोर्चे ,काढले निवेदने दिली गेली मात्र शासन प्रशासनाने मैत्रेय प्रकरण गांभिर्याने चर्चेत घेतले नाही.गुंतवणूकदारांना दिलासा म्हणून कोर्टात काही सुरू आहे ,परतावे मिळतील या आशेवर गुंतवणूकदार परताव्याच्या प्रतिक्षेत आहेत.ज्या विद्यमान संस्था, संघटनांनी परतावे मिळवून देण्याचा ठेका घेतला त्यांचे गुंतवणूकदारांकडून परस्पर पैसा वसूल करून फक्त प्रयत्न असणार आहेत. परतावे मिळवून देण्याची हमी कोणीही घेतलेली नाही .यामध्ये संस्था, संघटना आणि संघटनेचे जे कोणी वकिल असतील त्यांचा रोल फक्त पैसा मिळेपर्यंत प्रयत्नशील राहण्याचा आहे.यामध्ये भरडले,लुटले जात आहेत ते पिडित गुंतवणुकदार.
*धनशक्ती विरूद्ध कामगार संघटना*
देशभरातील पिडित गुंतवणूकदार लोकांकडून जमवलेली कोट्यावधीची मालमत्ता मैत्रेय मॅनेजमेन्टकडे आहे आणि दुसऱ्या बाजूने मैत्रेय फसवणूक प्रकरणी मुंबई कोर्टात या धनशक्ती विरूद्ध लढण्यास गरिबांची कामगार संघटना उतरलेली आहे.मैत्रेय केस निकाली काढण्याची भिस्त संघटनेच्या वकिलाच्या खांद्यावर आहे.जोपर्यंत फिर्यादीकडून पैसे मिळतील तोपर्यत वकिल केस लढणार हे उघड आहे.संघटनेने वकिलाचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवलेले आहे.संघटनेने संघटना वकिलास काबूत ठेवले आहे कि संघटना सांगेल तेच तो ऐकणार संस्थेला वकिल कोण द्यायचा,द्यायचा कि नाही इथपासून मैत्रेय प्रकरण कशे हाताळायचे याचेही धडे संघटनाच अप्रत्यक्षरीत्या देते आणि हेच संघटनेचे प्रथमदर्शनी यश समजले जात आहे. कामगार संघटनेने विडा उचललेला आहे कि,मैत्रेय परतावे मिळेपर्यंत संघर्ष करत राहायचा कोणत्याही गोष्टींचा परिणाम स्वतः वर होवू न देता.मैत्रेय परतावे मिळवून देण्यासाठी कामगार संघटना एवढी पेटून उठली आहे कि,नातेसंबंधाचा, विरोधकांचा विरोध झुगारून परतावे मिळेपर्यंत मागे हटायचे नाही.हि बाब पिडित गुंतवणूकदार लोकांसाठी हितकारक समजली जात आहे. लाखों पीडितांच्या कोट्यावधी रूपयांच्या फसवणूक प्रकरणात एक वकील, कामगार संघटनेच्या सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या दोन महिला किती वर्षांत आणि कितपत यशस्वी ठरतात याकडेच संपूर्ण गुंतवणुकदारांचे लक्ष आहे.











































