Home बुलडाणा गावकऱ्यांनी आता मानापानाचा विचार सोडून द्यावा, संविधानापुढे सर्व समान- ठाणेदार शिंगटे. गणेशोत्सवाच्या...

गावकऱ्यांनी आता मानापानाचा विचार सोडून द्यावा, संविधानापुढे सर्व समान- ठाणेदार शिंगटे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दे.माळी येथे शांतता समिती व जातीय सलोखा कार्यक्रम संपन्न .

150

देऊळगाव माळी प्रतिनिधी कैलास राऊत.

आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना आता अनेक पिढीचा पूर्वपार चालत आलेल्या काही अनिष्ट परंपरा व त्यातील समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या काही गोष्टी त्यामध्ये मानापनाचा विषय असेल , मी मोठा तो लहान असे न मानता आता संविधान व कायद्यापुढे सर्व समान आहे सर्वांना समान अधिकार आहे त्यामुळे गावागावात मानापानाचा आग्रह न धरता सर्वांना समान वागणूक द्यावी कायदा व सुव्यवस्था कशी आबादित राहील यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन 12 डिसेंबर रोजी देऊळगाव माळी येथे आयोजित केलेल्या जातीय सलोखा व शांतता समिती कार्यक्रमात मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिंगटे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणपती संस्थानचे अध्यक्ष विष्णू खरात हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार शिंगटे ,कॉन्स्टेबल करडे, तान्हापोळा उत्सव समितीचे अध्यक्ष नारायण बळी ,पांडुरंग संस्थेचे अध्यक्ष बाबुराव बळी, पोलीस पाटील गजानन चाळगे, पोलीस कॉन्स्टेबल रिंढे,उंबरकर,बेंडवाल, तंटामुक्ती अध्यक्ष केशव मगर, पत्रकार कैलास राऊत, पञकार रवींद्र सुरुशे, हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार कैलास राऊत त्यांनी केले, यावेळी ठाणेदार शिंगटे पुढे बोलताना म्हणाले की गावात एकाच मार्गाने बैल येतात आणि जातात त्यामुळे अनेक वेळा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या वर्षीपासून मार्गात बदल, नशा पाणी न करणे बैलांना काडी न मारणे अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी केल्या कार्यक्रमाला बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते, यावेळी ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन पञकार राजेश मगर यांनी केले .