
घाटंजी येथील गुरुदेव वार्ड घाटी येथे घाटंजी पोलीसांकडुन 42,200 रुपयांचे गोमांस जप्त.
➡️ गुरुदेव वार्ड घाटी येथील 5 आरोपी विरुद्ध कलम 5, अ, ब, क, कलम 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम भादंवि 429, 34 अंतर्गत गुन्हे दाखल..!
- ( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : घाटंजी येथील गुरुदेव वार्ड घाटी येथे घाटंजी पोलीसांनी 42,200 रुपयाचे गोमांस जप्त करुन सरकारतर्फे फिर्यादी पोलीस हवालदार महादेव देवराव डाखोरे (51) व विनोद मोतीराम मेश्राम (42) आदींच्या तक्रारीवरुन आरोपी शेख तनवीर शेख करीम (36), शेख जमीर शेख करीम (30) व विशाल सुभाष तेलंगे (21) आणि शेख युनुस शेख चांद (34) व शेख रिजवान शेख इरफान (27) रा. गुरुदेव वार्ड मदीना मस्जिद जवळ, घाटंजी यांचे विरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 826/2023 व 828/2023 अंतर्गत कलम 5, अ, ब, क, कलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम भादंवि 429, 34 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहे. सदर प्रकरणामुळे घाटंजी शहरात खळबळ माजली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटंजी येथील गुरुदेव वार्ड मदीना मस्जिद जवळ 3 पोत्यात 35 किलो गोवंशमास साहित्यासह अंदाजे किंमत 6300 तसेच कत्तली करिता बांधुन ठेवलेले एक पांढ-या रंगाची गोवंषी जातीची गाय अंदाजे किंमत 10,000 रुपये, एक गोवंश जातीचा पांढ-या रंगाचा वासरु अंदाजे किंमत 5,000 असा एकुण 31,300 रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन घाटंजी पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
फिर्यादी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, नामे शेख तनवीर शेख करीम याने त्याचे राहते घरी कत्तली करिता जनावरे आणुन जनावरांची गोमांस कत्तल करित आहे, अशी माहिती मिळाली. घाटंजी पोलीसांनी पाहणी केली असता, वरिल तिन्ही आरोपी हे गोवंश जनावरांचे गोमांस पाण्याने धुवून पोत्यात भरत असतांना दिसुन आले.
अपराध क्रमांक 828/2023 प्रकरणात 2 आरोपी विरुद्ध वरिल प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले असून यात 10,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात फिर्यादी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, घाटंजी येथील संत मारोती वार्ड इस्लामपुरा येथे जनावरे आणुन जनावरांची कत्तल करित आहे, अशा माहितीवरुन घाटंजी पोलीसांनी एका महिला घरमालकीन यांस विचारपुस केली असता, तिने तिच्या घरात गोमांस असल्याचे सांगितले. या बाबत घाटंजी येथील पोलीस पथकाने पाहणी केली असता, “सदरचे गोमांस आरोपी क्रमांक 1) शेख युनुस शेख चांद (34) व आरोपी क्रमांक 2) शेख रिजवान शेख इरफान यांनी शुक्रवारी सकाळी गोवंश जातीचे मांस माझ्या घरी आणुन ठेवले” असुन मांस त्यांचेच आहे, असे तिने घाटंजी पोलीसांना सांगितले. यातील आरोपींनी पंचा समक्ष हजर करुन आरोपींनी पंचासमक्ष कबुली दिली असल्याचे घाटंजी पोलीसांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर, पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे, पोलीस उप निरीक्षक नागेश खाडे, पोलीस शिपाई शेख कलीम, पोलीस हवालदार महादेव डाखोरे, विनोद मेश्राम, दिनेश भुसे आदींनी केली.
घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे, पोलीस हवालदार महादेव डाखोरे हे पुढील तपास करित आहे.











































