Home यवतमाळ घाटंजी पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा संपन्न..!

घाटंजी पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा संपन्न..!

147

( अयनुद्दीन सोलंकी )

————————–
घाटंजी :- घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची सभा घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

आगामी सन उत्सव निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी घाटंजी पोलीस स्टेशनच्या परिसरात शांतता कमेटीची सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, आगामी सन उत्सव साजरा करत असतांना शांतपणे उत्सव साजरे करावे, कुठल्याही प्रकारचे गाल बोटं न लागता शांततेत पार पाडावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या प्रसंगी शांतता समितीचे सदस्य मोरेश्वर वातीले, सुनील देठे, मधुकर निस्ताने, डॉ. विजय कडू, शुभाष गोडे, संदीप मुनोत, भगवान डोळे, संघपाल कांबळे, राजेश निकोडे, संजय ढोणे, उस्मान मामु आदी उपस्थित होते. शातंता समिती बैठकीचे आयोजन गोपनीय विभागाचे पोलीस शिपाई वामन जाधव, यांनी केले होते. पोलीस स्टेशन मध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीला घाटंजी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच घाटंजी तालुक्यातील संपादक, पत्रकार, बातमीदार, वार्ताहर आदीं आवर्जून उपस्थित होते.