Home यवतमाळ घाटंजी महिला प्रोडयुॅसर कंपनी लिमिटेड व वसुंधरा उत्पादक संघ पारवा येथील उमेद...

घाटंजी महिला प्रोडयुॅसर कंपनी लिमिटेड व वसुंधरा उत्पादक संघ पारवा येथील उमेद अभियानात 19 लाख 32 हजार रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप..!

164

➡️ घाट एथील एका वार्ताहर

घाटंजी येथील एका वार्ताहराची लेखी तक्रार…!

(अयनुद्दीन सोलंकी)
————————
घाटंजी:- घाटंजी तालुक्यात महाराष्ट्र जीवन्नोवती उमेद अभियानामध्ये घाटंजी महिला प्रोडयुसर कंपनी व वसुंधरा महिला उत्पादन संघ पारवा मध्ये 19 लाख 32 हजार रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित उमेद विभागाकडुन आरोपीला वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.

सदर प्रकरणात चौकशी करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशी समितीचे प्रमुख लेखाधिकारी चंद्रशेखर राऊत, कार्यालयीन अधीक्षक शैलेश बैसारे, जिल्हा व्यवस्थापक सारंग आगरकर व इतर या चौघांचा समितीत समावेश आहे.

या प्रकरणा बाबत संबंधित तक्रारदार/पत्रकार यांनी चौकशी प्रमुख लेखाधिकारी चंद्रशेखर राऊत, कार्यालयीन अधीक्षक शैलेश बैसारे यांना चौकशी संदर्भात काय चौकशी झाली म्हणून विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही व माहिती देण्यास टाळाटाळ केली, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

तदनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री, उमेद अभियान विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली. तथापि, संबंधित दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सुद्धा संबंधित तक्रारदार/पत्रकार यांनी केली आहे. तक्रारदार हे यवतमाळ वरुन प्रकाशित होणाऱ्या एका प्रतिष्ठित दैनिकाचे घाटंजी येथील वार्ताहर आहे.

घाटंजी महिला उत्पादन कंपनी स्थापना करण्यासाठी प्रति महिलां कडून ₹ 1500 चे शेअर्स गोळा करण्यात आले. जवळपास सोळाशे महिलांनी शेअर्स गोळा केले. परंतु शेअर्स जमा केल्याची पावती सुद्धा महिलांना देण्यात आली नाही. कंपनी रजिस्टर करण्याच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले आहे. कंपनीच्या नावाने ऑनलाईन भाजीपाला विक्री व्यवसाय करण्यात सुरू करण्यात आला. त्याचा कोणताही रेकोर्ड संबंधिताकडे उपलब्ध नाही. कंपनीच्या नावाने सोयाबीन खरेदी करण्यात आली. सन 2021-22 मध्ये हिंगणघाट मार्केट यार्ड व यवतमाळ मार्केट यार्ड मध्ये विक्री केलेल्या सोयाबिनची विक्री पावती नुसार एकुण रक्कम रु 19 लाख 32 हजार 753 रुपयाचे सोयाबीन बादल जयसिंग राठोड याने 9 लाख 20 हजार व प्रभाकर नागोराव करमनकर यांनी 10 लाख बारा हजार 753 रुपयाचे सोयाबीन या दोघांनी आपल्या नावाने हिंगणघाट येथे टाकले होते, जे नियमबाह्य होते. वास्तविक पाहता सदरची रक्कम FPO च्या बॅक खात्यात जमा करणे आवश्यक होते.

उमेद अभियानातील प्रभाग कृषि व्यवस्थापक (CAM) यांनी कंपनीची नावावे खरेदी केलेले सोयाबीन स्वतःच्या नावाने हिंगणघाट येथे विक्री केल्याचे भक्कम पुरावे असल्याचे संबंधित तक्रारदाराचे म्हणने आहे.

वसुंधरा उत्पादक संघ, पारवा यांनी सन 2019-20 मध्ये सोयाबीन खरेदी विक्रीचा व्यवसाय केला होता. घाटंजी तालुक्यातील उन्नती, नविदिशा व चैतन्य प्रभागसंघ या तिन्ही प्रभाग मिळुन व्यवसाय करण्याचे ठरले. तसेच वसुंधरा उत्पादक संघ स्थापन करण्यात आले. 20 लाख रुपये प्रति प्रभाग याप्रमाणे एकुण 60 लाख रुपये वसुंधरा उत्पादक संघामध्ये सुरवातीला जमा करण्यात आले.

सोयाबिन ट्रेडिंगचा व्यवसाय केला असता 1900 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. एकुण 69 लाख 26 हजार 909 रुपयाचे सोयाबीन खरेदी करण्यात आले.
त्या नंतर कळंब महिला उत्पादक कंपनी मार्फत हिंगणघाट येथील सगुना प्लांट येथे सोयाबीची विक्री करण्यात आली.

त्या पैकी 61 लाख 70 हजार 528 रुपये कळंब महिला उत्पादक कंपनी, कळंब यांच्या कडुन प्राप्त झाले. उर्वरित रक्कम कळंब महिला उत्पादक कंपनी कळंब यांचे कडे बाकी आहे.
तसेच वसुंधरा उत्पादक संघाच्या माध्यमातून कृषी केंद्रांतुन एकत्रीत बियाणे खरेदी करण्यात आले. त्यात उन्नती प्रभाग संघ, पारवा प्रभाग संघाने एकुन 30 लाख रुपयाची गुंतवणुक केली.

तसेच नविदीशा प्रभाग संघ, पार्डी (नस्करी) यांनी 10 लाख रुपये गुंतवलेआहे. तसेच हमाली, बारदाना, गाडी भाडे, संकलन केंद्र भाडे, मजुरी, मानधन, किरकोळ व इतर खर्च, प्रवास खर्च व साहित्य खरेदी, वजन काटे, टोपले, सुतळी बंडल करिता खर्च करण्यात आले.

वसुंधरा उत्पादक संघाचे ऑडिट रिपोर्ट नुसार एकुण उलाढाल 1 कोटी 17 लाख 5 हजार 955 रुपयाची उलाढाल झाली आहे.
स्वतःच्या नावाने हिंगणघाट येथे विक्री केलेला सोयाबीन हे स्वतःच्या मालकीचा नसतांना नियमबाह्य विक्री करण्यात आला. सदर नियमबाह्य सोयाबीन विक्री प्रकरणातील वादग्रस्त रक्कम उमेद विभागाला बादल जयसिंग राठोड (CAM) यांचे कडुन 1 लाख 79 हजार 690 रुपये तर प्रभाकर नागोराव करमनकर (CAM) यांचे कडुन 4 लाख 2 हजार 843 रुपये वसुल करणे बाकी असल्याने घाटंजी महिला प्रोडयुसर कंपनी लिमिटेड व वसुंधरा उत्पादक संघ, पारवा येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा चौकशीचा अहवाल जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, यवतमाळ यांचे कडे तालुका अभियान व्यवस्थापक अमित जाधव यांनी पाठविला आहे.

➡️ घाटंजी तालुका अभियान व्यवस्थापक अमित जाधव यांचेशी संपर्क केला असता, घाटंजी महिला प्रोडयुसर कंपनी व वसुंधरा उत्पादक संघ, पारवा प्रकरणाचा चौकशीचा अहवाल जिल्हा व्यवस्थापक धिरज नखाते यांचे कडे या पुर्वी पाठविला आहे. स्वतः च्या खात्यावर नियमबाह्य जमा केलेली सोयाबीनची रक्कम (CAM) बादल राठोड व (CAM) प्रभाकर करमनकर यांनी FPO च्या बॅक खात्यात काही रक्कम जमा केली असून बादल राठोड यांचे कडून अंदाजे 50 हजार रुपये पर्यंतची रक्कम वसुल करणे बाकी आहे, असे अमित जाधव यांनी सांगितले. तसेच सदर प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.