Home बुलडाणा वडनेर भोलजी मध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या ,

वडनेर भोलजी मध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या ,

104

 

 

नळा व्दारे होत आहे दूषित दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा ,

उमा बोचरे

नांदुरा तालुका प्रतिनिधी
वडनेर भोलजी हा गाव नांदुरा तालुक्यात महत्वाचा गाव आहे येथील लोकसंख्या आठ ते दहा हजार असून येथे मुबलक प्रमाणात जल साठा उपलब्ध असतांनाही ग्राम पंचायत च्या दुर्लक्षपणा मुळे आठ दहा दिवसातून एकदा दूषित पिवळा रंगाचा पाणी नळ व्दारे सोळल्या जात आहे होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्या मुळे येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून रोग राई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे नळात येणारा पाणी हे एकदम गढूळ येत आहे व त्याची दुर्गंधी येत असल्यामुळे गावात आजार पसरत आहे या कडे स्थानिक ग्राम पंचायत चे दुर्लक्ष होत आहे या गंभीर प्रकाराकडे त्वरीत जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित करून येथील दूषित पाण्याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे